CCTV | भाजप पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला, डोंबिवलीत भरदिवसा प्रकार

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. दोन्ही पक्ष एकमेकांवर अक्षरशः तुटून पडले आहे. भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांच्याकडून सातत्याने शिवसेना नेत्यांना लक्ष्य केले जात आहे

CCTV | भाजप पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला, डोंबिवलीत भरदिवसा प्रकार
डोंबिवलीत भाजप पदाधिकाऱ्यावर हल्लाImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Feb 28, 2022 | 1:35 PM

डोंबिवली : भाजपचे सोशल मीडिया प्रभारी मनोज कटके (Manoj Katke) यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली शहरात (Dombivali) आज (सोमवारी) सकाळी हा प्रकार घडल्याची माहिती आहे. पोलीस सत्ताधाऱ्यांचे मिंधे झाले आहेत. या भ्याड हल्ल्याचा तपास आजच लागला पाहिजे, नाही तर काय करायचे ते ठरवू, असा संताप भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. डोळ्यात मिरचीची पूड टाकून त्यांना खाली पाडण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे. मनोज कटके यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

काय आहे प्रकरण?

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. दोन्ही पक्ष एकमेकांवर अक्षरशः तुटून पडले आहे. भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांच्याकडून सातत्याने शिवसेना नेत्यांना लक्ष्य केले जात आहे. हे सर्व घडत असताना आज सकाळी जिल्ह्याचे सोशल मीडिया प्रभारी मनोज कटके यांच्यावर काही अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

कार्यकर्त्यांची गर्दी

रुग्णालयाच्या बाहेर भाजप आमदार रविंद्र चव्हाण आणि भाजप कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमले आहेत. या भ्याड हल्ल्याचा आजच तपास लागला पाहिजे. पोलिस हे सत्ताधाऱ्यांचे मिंधे झालेले आहेत. आज तपास लागला नाही तर उद्या काय करायचे ठरवू अशी संतापजनक प्रतिक्रिया भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी दिली आहे.

या हल्ल्यामुळे कल्याण डोंबिवलीचे राजकारण चांगलेच तापणार आहे, यात कोणतीही शंका नाही. या प्रकरणाचा तपास रामनगर पोलिसांनी सुरु केला आहे. रुग्णालयात पोलिस देखील मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या :

बहिणीच्या दुसऱ्या लग्नाला आक्षेप, भावाचा प्राणघातक हल्ला, ताईसह होणारा नवरा गंभीर जखमी

प्रेम विवाहानंतरही बायकोचं एक्स-बॉयफ्रेण्डशी लफडं सुरु, चिडलेल्या नवऱ्याकडून जन्माची अद्दल

नागपूर कारागृहात गुंडाचा जेलरवर हल्ला, तुरुंगातील कर्मचाऱ्यांकडून कैद्याची धुलाई

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.