मुंबईच्या सोनाराची टिटवाळ्यात लूट, पंक्चर काढताना 1 कोटी 20 लाखांचे दागिने-रोकड लंपास
जैन गाडी बाजूला घेऊन जॅक लावत होते. गाडीतून जैन आणि त्यांचा पुतण्या दोघे खाली उतरले असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गाडीत ठेवलेली बॅग उचलून तेथून पळ काढला.
कल्याण : मुंबईहून सोन्याची डिलिव्हरी करण्यासाठी आलेल्या सोनाराला (Jeweler Loot) अज्ञात चोरट्याने लुबाडले. ठाणे जिल्ह्यात टिटवाळा शहरात ही धक्कादायक घटना उघडकीस (Titwala) आली आहे. सोनाराची गाडी रिजन्सी रोडवर पंक्चर झाली होती. त्यामुळे त्याने गाडी बाजूला उभी केली होती. यावेळी गाडीला जॅक लावताना अज्ञात चोरट्यांनी संधी साधली आणि गाडीतील 2300 ग्रॅम सोनं आणि रोकड असा सुमारे 1 कोटी 20 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल (Gold Theft) चोरुन नेला . या प्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्यांचा शोध सुरु केला आहे.
काय आहे प्रकरण?
मुंबई येथे राहणारे राकेश जैन हे सोन्याचे व्यापारी आहेत. राकेश जैन मंगळवारी आपल्या पुतण्यासह सोन्याच्या दागिन्यांची डिलिव्हरी करण्यासाठी टिटवाळा परिसरात आले होते. त्यांच्या गाडीत एका बॅगेमध्ये चैन, अंगठी, लगड असे एकूण 2300 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि चार लाख रुपयांची रोकड होती.
गाडीचं पंक्चर काढताना बॅग लंपास
त्यांची गाडी टिटवाळा मंदिर परिसरातील रिजन्सी रोड येथून जात असताना अचानक पंक्चर झाली. जैन गाडी बाजूला घेऊन जॅक लावत होते. गाडीतून जैन आणि त्यांचा पुतण्या दोघे खाली उतरले असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गाडीत ठेवलेली बॅग उचलून तेथून पळ काढला.
काही वेळाने जैन यांना आपली बॅग चोरीला गेल्याचे लक्षात आले. या प्रकरणी त्यांनी टिटवाळा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. टिटवाळा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत अज्ञात चोरट्यांचा शोध सुरु केला आहे.
संबंधित बातम्या :
पुण्यात कोयत्याच्या धाकाने सराफाची लूट, 73 हजारांच्या सोनसाखळ्यांची चोरी
‘मॉर्निंग वॉक’ला निघालेल्या दोघांना अडवलं, भररस्त्यात लुटीचा थरार
तरुणींसोबत मजा मस्ती करण्यासाठी आठ लाखांची चोरी, मुंबईत 28 वर्षीय कार ड्रायव्हरला अटक