CCTV | डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनविना औषध देण्यास नकार, नशेखोरांनी केमिस्टचे दुकान फोडले

दोघे नशेखोरांनी मेडिकल चालकाकडे कोरेक्स औषध मागितले. मेडिकल चालकाने डॉक्टरच्या परवानगी शिवाय हे औषध देऊ शकत नाही, असं म्हणत डॉक्टरचे प्रिस्क्रिप्शन आणण्यास सांगितले.

CCTV | डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनविना औषध देण्यास नकार, नशेखोरांनी केमिस्टचे दुकान फोडले
केमिस्ट चालकाला मारहाणImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Mar 05, 2022 | 2:33 PM

कल्याण : नशेसाठी कासावीस झालेले नशेखोर कोणत्या थराला जातील, याचा काही नेम नाही. डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन (Doctor Prescription) शिवाय औषध देण्यास मेडिकल चालकाने नकार दिला. त्यामुळे दोघांनी केमिस्टच्या दुकानाची तोडफोड (Chemist) केली. कल्याणजवळ (Kalyan Crime) असलेल्या बनेली परिसरात हा प्रकार घडला. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कोरेक्स औषध देण्यास केमिस्टने नकार दिला होता. नशेच्या आहारी गेलेल्या दोघा तरुणांनी मेडिकलची तोडफोड केली. नशेखोर तरुणांचा हा थयथयाट सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.

काय आहे प्रकरण?

रात्रीच्या सुमारास हे दोन तरुण बनेली परिसरात डॉ. आंबेडकर चौक येथील वेलकम मेडिकलमध्ये आले. त्यांनी मेडिकल चालकाकडे कोरेक्स औषध मागितले. मेडिकल चालकाने डॉक्टरच्या परवानगी शिवाय हे औषध देऊ शकत नाही, असं म्हणत डॉक्टरचे प्रिस्क्रिप्शन आणण्यास सांगितले.

या दोन तरुणांनी पुन्हा मागणी केली, मात्र मेडिकल चालकाने औषध देण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या या दोन्ही नशेखोर तरुणांनी मेडिकल चालकाला ठोशा-बुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.

मारहाण, शिवीगाळ आणि तोडफोड

दोघे इतक्यावर थांबले नाहीत, तर त्यांनी मेडिकलच्या काऊण्टर आणि दोन फ्रिज ढकलून देत तोडफोड केली. काऊण्टर वरील औषधे अस्ताव्यस्त फेकली.

पाहा व्हिडीओ :

या प्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. नशेखोरांनी कोरेक्ससाठी केलेल्या धिंगाण्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

संबंधित बातम्या :

VIDEO | राज ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, मनसे कार्यकर्त्यांचा तरुणाला चोप

VIDEO | भाजप नगरसेवकाकडून मारहाण, नागपुरात काँग्रेस कार्यकर्त्याचा विक्की कुकरेजांवर आरोप

CCTV | जागा आमची, पत्रे आमचे, तू का हटवतोस? डोंबिवलीत वादावादी, दोघा भावांची बिल्डरला मारहाण

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.