घरकाम करणाऱ्या महिलेची दगडाने ठेचून हत्या, कल्याणच्या उच्चभ्रू भागात मृतदेह आढळला

मयत महिलेचे नाव लक्ष्मी मोहिते आहे. ती त्याच परिसरात घरकाम करते. लक्ष्मी ही भिवंडीतील सावद गाव परिसरात राहत होती. लक्ष्मीची हत्या तिचा पती जर्नादन मोहिते याने केली असल्याचा संशय पोलिसांना आहे.

घरकाम करणाऱ्या महिलेची दगडाने ठेचून हत्या, कल्याणच्या उच्चभ्रू भागात मृतदेह आढळला
कल्याणमध्ये महिलेचा मृतदेह आढळला
Follow us
| Updated on: Sep 06, 2021 | 1:49 PM

कल्याण : कल्याणच्या हाय प्रोफाईल गांधारी परिसरात दिवसाढवळ्या एका घरकाम करणाऱ्या महिलेचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. महिलेच्या पतीने तिची हत्या केल्याचा संशय आहे. सध्या खडकपाडा पोलिस या हत्या प्रकरणाचा तपास करत आहेत.

नेमकं काय घडलं?

मयत महिलेचे नाव लक्ष्मी मोहिते आहे. ती त्याच परिसरात घरकाम करते. लक्ष्मी ही भिवंडीतील सावद गाव परिसरात राहत होती. लक्ष्मीची हत्या तिचा पती जर्नादन मोहिते याने केली असल्याचा संशय पोलिसांना आहे. सोमवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे.

कल्याण पश्चिमेतील हाय प्रोफाईल गांधारी परिसरात रिंग रोड रस्त्याचे काम सुरु आहे. या रस्त्यावर एका महिलेचा मृतदेह आढळून आला. याची माहिती कल्याणच्या खडकपाडा पोलिसांना देण्यात आली. वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक पवार आणि पीआय शरद जिने हे पोलिस पथकासमोत घटनास्थळी दाखल झाले.

दगडाने ठेचून हत्या

जालना जिल्ह्यात राहणारा लक्ष्मीचा पती आणि संशयित जनार्दन मोहिते सध्या बेपत्ता आहे. लक्ष्मीची हत्या दगडाने ठेचून करण्यात आली आहे. महिलेच्या हत्येने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

जेलमधून सुटलेल्या जावयाकडून सासूची हत्या

दुसरीकडे, तुरुंगातून सुटल्यानंतर अवघ्या दोन दिवसातच तरुणाने आपल्या सासूची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील येरवडा तुरुंगातून बाहेर आल्यानंतर 42 वर्षीय जावयाने मुंबईत येऊन आपल्या सासूबाईंचा जीव घेतला. बायकोचा ठावठिकाणा सांगण्यास सासूने नकार दिल्याच्या रागातून त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

आरोपी अब्बास शेखला दरोडा टाकल्याच्या प्रकरणात 3 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. गेल्या आठवड्यात त्याची पुण्याच्या येरवडा तुरुंगातून सुटका झाली. दोन दिवसांनंतर त्याने मुंबई गाठली. पत्नीचा नवा पत्ता जाणून घेण्यासाठी शेख गेल्या आठवड्यात दुपारी साडे बारा वाजताच्या सुमारास सासूच्या घरी गेला होता.

डोक्यावर फरशीने अनेक वेळा वार

सासूने तुरुंगाबाहेर आलेल्या जावयाला लेकीचा पत्ता देण्यास नकार दिला. त्यामुळे घरातच दोघांमध्ये मोठा वादविवाद झाला. त्यानंतर, चिडलेल्या जावयाने घरातच तिच्या डोक्यावर फरशीने अनेक वेळा वार करुन तिची हत्या केल्याचा आरोप आहे. वृद्ध महिला राहत्या घरी मृतावस्थेत आढळल्यामुळे मुंबईतील विलेपार्ले भागात गेल्या आठवड्यात एकच खळबळ उडाली होती.

हरियाणातील सामूहिक हत्याकांडाचा उलगडा

दरम्यान, हरियाणाच्या रोहतकमधील प्रॉपर्टी डीलर प्रदीप मलिक उर्फ बबलू पहलवान, त्याची पत्नी बबली, मुलगी तमन्ना उर्फ ​​नेहा आणि सासू रोशनी यांच्या हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. मुलगा अभिषेकच्या समलैंगिक संबंधांना कुटुंबाने विरोध केल्याने आणि सेक्स चेंज ऑपरेशनसाठी पैसे न दिल्याने त्याने चौघांची हत्या केल्याचा आरोप आहे. एकाच कुटुंबातील चौघांच्या हत्येने देशभरात खळबळ उडाली होती.

संबंधित बातम्या :

चिंचेच्या झाडामागे दबा धरला, मंदिरात जाताना बिल्डरची पहाटे तीन वाजता हत्या, विरारमध्ये खळबळ

येरवडा जेलमधून सुटल्यावर मुंबई गाठली, डोक्यात फरशी घालून सासूची हत्या

दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.