पैसे-मोबाईल दे, नाहीतर ठार मारेन, कल्याण स्टेशनवर तलवार दाखवून प्रवाशाला लुटण्याचा प्रयत्न

तलवारीचा धाक दाखवत आरोपीने प्रीतमला जवळ असलेले पैसे आणि मोबाईल दे, नाहीतर ठार मारेन अशी धमकी दिली. सुदैवाने लोकलच्या प्रतीक्षेत उभा असलेला आणखी एक प्रवासी विक्की मोरे तलवार बघून पुढे सरसावला. दोघांनी आरडाओरड केल्याने ड्युटीवर असलेल्या पोलिसांचं लक्ष गेलं.

पैसे-मोबाईल दे, नाहीतर ठार मारेन, कल्याण स्टेशनवर तलवार दाखवून प्रवाशाला लुटण्याचा प्रयत्न
तलवारीच्या धाकाने कल्याण स्टेशनवर लुटीचा प्रयत्न
Follow us
| Updated on: Sep 01, 2021 | 11:14 AM

कल्याण : प्रवाशाला थेट तलवारीचा धाक दाखवत लुटण्याचा प्रयत्न झाल्याची घटना कल्याण रेल्वे स्थानकावर घडली. प्रवाशाने आरडाओरड केल्याने फलाटावर तैनात असलेल्या रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली. निखिल वैरागर असे या चोरट्याचे नाव असून त्याने याआधी किती प्रवाशांना अशा प्रकारे लुटले आहे, याचा शोध रेल्वे पोलीस घेत आहेत.

नेमकं काय घडलं?

आंबिवली येथे राहणारा तरुण प्रीतम पाटील हा 29 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानकावरील 2 नंबर फलाटावर पुलाच्या खाली लोकलची वाट पाहत उभा होता. इतक्यात पुलावरून निखिल वैरागर हा 21 वर्षीय तरुण त्याच्याजवळ आला. निखिलने आपल्या शर्टाच्या आत लपवून ठेवलेली तलवार बाहेर काढली.

तलवार दाखवून धमकी

तलवारीचा धाक दाखवत आरोपीने प्रीतमला जवळ असलेले पैसे आणि मोबाईल दे, नाहीतर ठार मारेन अशी धमकी दिली. सुदैवाने लोकलच्या प्रतीक्षेत उभा असलेला आणखी एक प्रवासी विक्की मोरे तलवार बघून पुढे सरसावला. दोघांनी आरडाओरड केल्याने ड्युटीवर असलेल्या पोलिसांचं लक्ष गेलं.

पोलिसांकडून आरोपीला बेड्या

त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत निखिलला ताब्यात घेतलं. कल्याण जीआरपीमध्ये निखिलच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

शहापूर स्टेशनवर महिलेचा मोबाईल चोरण्याचा प्रयत्न

दुसरीकडे, कामानिमित्त शहाडला आलेल्या मुंबईकर महिलेच्या हातातील मोबाईल खेचण्याचा प्रयत्नही नुकताच रेल्वे स्टेशनवर झाला होता. यावेळी महिलेने प्रतिकार केला मात्र तिला हिसका देऊन मोबाईल हिसकावून चोरट्याने पळ काढला. या झटापटीत महिलेचे काही दागिने गायब झाले. मात्र महिलेने पाठलाग करत चोराला पकडले. याच दरम्यान एक पोलीस कर्मचारी आणि काही नागरिक त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी या चोरट्याला पकडले. शाहरुख गफूर शेख या चोरट्याला कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली होती.

मूकबधीर तरुणीवर बलात्कार करुन मोबाईल चोरी

दरम्यान, मूकबधीर तरुणीवर बलात्कार करुन, तिचा महागडा मोबाईल हिसकावून पसार झालेल्या आरोपीला कल्याण पोलिसांनी गुजरातहून अटक केल्याची घटना गेल्याच महिन्यात उघडकीस आली होती. मूकबधीर तरुणीवरील बलात्काराच्या घटनेमुळे कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली होती. पहाटेच्या सुमारास मूकबधीर तरुणीवर बलात्कार करुन तिचा मोबाईल हिसकावून आरोपी पसार झाला होता. मात्र कल्याण स्थानकात लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात आरोपी कैद झाला होता.

संबंधित बातम्या :

मूकबधिर तरुणीवर बलात्कार करुन मोबाईल चोरी, कल्याण पोलिसांकडून आरोपीला गुजरातमध्ये अटक

स्टेशनवर हिसका देऊन मोबाईल पळवला, पाठलाग करुन महिलेने चोरट्याला पकडलं

मुंबईत कामासाठी पहिल्यांदाच आला, रेल्वेत लहान मुलीच्या हातात मोबाईल बघून नजर फिरली, आता थेट जेलमध्ये रवानगी

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.