CCTV | घराबाहेर उभ्या तरुणांच्या अंगावर बुलेट घातली, उल्हासनगरात पोलिसांची दादागिरी

उल्हासनगरच्या कॅम्प 3 परिसरात थर्टी फर्स्टच्या रात्री पोलिसांची गस्त सुरु होती. कौशल नगर परिसरात रात्रीच्या सुमारास काही तरुण एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी घराबाहेर जमले होते.

CCTV | घराबाहेर उभ्या तरुणांच्या अंगावर बुलेट घातली, उल्हासनगरात पोलिसांची दादागिरी
उल्हासनगरमध्ये पोलिसाचा तरुणांवर हल्ला
Follow us
| Updated on: Jan 02, 2022 | 11:41 AM

उल्हासनगर : उल्हासनगरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांनी थर्टी फर्स्टच्या रात्री मात्र दादागिरी केल्याचं समोर आलं आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने घराबाहेर उभ्या असलेल्या तरुणांच्या अंगावर बुलेट घालत जो दिसेल त्याला मारहाण केली. ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर शहरात घडलेल्या प्रकाराचे सीसीटीव्ही फूटेज समोर आले आहे.

काय आहे प्रकरण?

उल्हासनगरच्या कॅम्प 3 परिसरात थर्टी फर्स्टच्या रात्री पोलिसांची गस्त सुरु होती. कौशल नगर परिसरात रात्रीच्या सुमारास काही तरुण एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी घराबाहेर जमले होते. याचवेळी रात्रीच्या गस्तीवर असलेले मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पानसरे हे तिथून त्यांच्या बुलेटवर चालले होते.

घराबाहेर उभ्या असलेल्या मुलांना पाहून त्यांनी थेट मुलांच्या अंगावर बुलेट घातली. इतकंच नव्हे, तर जो सापडेल त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत सुटले. तर एकाला पोलीस ठाण्यात नेऊन त्याच्यावर कारवाई सुद्धा केली.

तरुणाला मुका मार, मोबाईलही फुटला

एपीआय पानसरे यांनी केलेल्या या मारहाणीत काही तरुणांना मुका मार लागला आहे. तर एका तरुणाचा मोबाईल सुद्धा फुटला आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही घटना घडली, त्यावेळी पानसरे हे दारूच्या नशेत असल्याचा आरोप पीडित तरुणांनी केलाय.

या सगळ्यावर पोलिसांची प्रतिक्रिया विचारली असता, पोलिसांनी बोलण्यास नकार दिलाय. मात्र ज्यांच्या हाती कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी असते, त्यांनी असा उन्माद करणं कितपत योग्य आहे? असा प्रश्न यानंतर उपस्थित केला जातोय.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

पोटच्या दोन मुलांना बिल्डिंगच्या 15 व्या मजल्यावरुन फेकलं, सैतान बापासह प्रेयसीला फाशी

भंडाऱ्यातून पळून नागपुरात आले, संसार थाटला; पण, दारूचे व्यसन लागले अन् प्रेमविवाह भंगला!

पाचवीतल्या विद्यार्थिनीची आत्महत्या; महिन्यातील दुसरी घटना, नेमके कारण काय?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.