VIDEO | दुकानदार मागे वळताच ग्राहकाचा मोबाईलवर डल्ला, चोरीचा प्रकार CCTV मध्ये कैद
ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर शहरात कॅम्प 1 मधील बसंतराम चौकात मोतीलाल कुलवाधवा यांचं किराणा दुकान आहे. या दुकानात मंगळवारी दुपारच्या सुमारास दोघे जण खाद्यपदार्थ विकत घेण्यासाठी आले होती.
उल्हासनगर : किराणाच्या दुकानातून दुकानदाराचा मोबाईल चोरुन नेल्याची घटना उल्हासनगरात घडली आहे. कोल्ड ड्रिंक घेण्याच्या बहाण्याने आलेल्या ग्राहकांनी दुकान चालकाच्या मोबाईलवर डल्ला मारल्याचं समोर आलं आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे.
काय आहे प्रकरण?
ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर शहरात कॅम्प 1 मधील बसंतराम चौकात मोतीलाल कुलवाधवा यांचं किराणा दुकान आहे. या दुकानात मंगळवारी दुपारच्या सुमारास दोघे जण खाद्यपदार्थ विकत घेण्यासाठी आले होती. यावेळी दुकानदार मोतीलाल कुलवाधवा यांच्याकडे त्यांनी शीतपेयाची बाटली मागितली.
नेमकं काय घडलं?
ही बाटली काढण्यासाठी कुलवाधवा मागे वळताच चोरट्यांनी रॅकमध्ये ठेवलेला त्यांचा मोबाईल चोरला. ही घटना मोतीलाल यांच्या लक्षात आली नाही. मात्र नंतर सीसीटीव्ही तपासलं असता त्यात मोबाईल चोरीला गेल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून पोलीस मोबाईल चोराचा शोध घेत आहेत.
पाहा व्हिडीओ :
मुंबईतील गोकुळधाम सोसायटीत मोबाईल दुकानात चोरी
दुसरीकडे, गोरेगाव पूर्वेला असलेल्या गोकुळधाम सोसायटीतील गोकुळ मोबाईल शॉप या दुकानाचे शटर तोडून लाखो रुपये किमतीच्या मोबाईलसह सीसीटीव्ही डीव्हीआर मशीन चोरट्यांनी चोरुन नेल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला होता. मात्र पोलिसांनी वेगाने तपास करत चौघा जणांना बेड्या ठोकल्या आणि त्यांच्याकडून संपूर्ण मुद्देमाल जप्त केला.
काय आहे प्रकरण?
22 सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडल्याची माहिती आहे. ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेमुळे घराघरात परिचित झालेल्या गोकुळधाम सोसायटीमध्ये चोरीचा प्रकार घडला. सोसायटीत असलेल्या गोकुळ मोबाईल या दुकानातून लाखोंच्या किमतीचे मोबाईल फोन आणि सीसीटीव्ही डीव्हीआर मशीन चोरीला गेले होते.
घटनेची माहिती मिळताच, मुंबई पोलिसांच्या झोन 12 च्या डीसीपी डॉ डी स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिसांनी 3 विशेष पथके तयार करून चोरांचा शोध सुरू केला. दिंडोशी पोलिसांनी मुंबईसह आसपासच्या भागातून चोरलेल्या संपूर्ण मुद्देमालासह चार चोरांना अटक केली आहे.
32 लाखांचे 167 महागडे मोबाईल
डीसीपी डॉ डी स्वामी यांनी सांगितले की मोबाईल दुकानातून विविध कंपन्यांचे 167 महागडे मोबाईल फोन चोरीला गेले होते, ज्याची किंमत 32 लाख 38 हजार 338 रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर, पोलिसांनी तीन विशेष पथके तयार केली आणि तीन ते चार दिवस सीसीटीव्ही फूटेज स्कॅन करण्यास सुरुवात केली. कठोर प्रयत्नांनंतर पोलिसांनी चार आरोपींना मुंबई आणि आसपासच्या परिसरातून वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक केली.
संबंधित बातम्या :
मुंबईतील गोकुळधाम सोसायटीतील मोबाईल दुकानात डल्ला, 167 महागडे फोन चोरीला
पाच महिलांची हातचलाखी, बसमध्ये बँक मॅनेजरच्या बॅगेतून अडीच लाख लांबवले, पुढे काय घडले?
VIDEO | ज्वेलरकडे खरेदीला आलेल्या ग्राहकाच्या पाटल्यांची चोरी, तीन महिला चोरांसोबत लहान मुलगाही