आई सतत दारुच्या नशेत असल्याचा राग, वसईत 18 वर्षांच्या मुलाकडून सख्ख्या आईची हत्या

वसईत 18 वर्षांच्या तरुणाने आपल्या 59 वर्षांच्या आईची हत्या केल्याचा आरोप आहे. आई सतत दारुच्या नशेत असते, या रागातून मुलाने टोकाचे पाऊल उचलले असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

आई सतत दारुच्या नशेत असल्याचा राग, वसईत 18 वर्षांच्या मुलाकडून सख्ख्या आईची हत्या
वसईत मुलाकडून आईची हत्या
Follow us
| Updated on: Jul 21, 2021 | 7:33 AM

वसई : आई सतत दारुच्या नशेत असते, म्हणून किशोरवयीन मुलाने आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वसईच्या कोळीवाडा परिसरात 59 वर्षांच्या महिलेची मंगळवारी रात्री करण्यात आली. या प्रकरणी 18 वर्षांच्या सख्ख्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

नेमकं काय घडलं?

वसईत 18 वर्षांच्या तरुणाने आपल्या 59 वर्षांच्या आईची हत्या केल्याचा आरोप आहे. आई सतत दारुच्या नशेत असते, या रागातून मुलाने टोकाचे पाऊल उचलले असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. वसईच्या कोळीवाडा परिसरातील आयशा अपार्टमेंटमध्ये मंगळवार 21 जुलै रोजी रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

घटनेची माहिती मिळताच वसई पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन तपास केला. आईचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे, तर आरोपी मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

साताऱ्यात पत्नीच्या व्यसनाला कंटाळून हत्या

दुसरीकडे, साताऱ्यात पतीने लाकडी दांडक्याने वार करत पत्नीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पत्नीला दारुचे व्यसन असल्याच्या रागातून पतीने हत्या केल्याचा आरोप आहे. योगायोग म्हणजे हत्येच्या कारणात साधर्म्य असलेल्या या दोन्ही घटना एकाच दिवशी उघडकीस आल्या, एक साताऱ्यात तर दुसरी वसईत.

पत्नीला दारु पिण्याचं व्यसन होतं, आपल्याला ते आवडत नव्हतं. यावरुन सतत भांडणं व्हायची. घटनेच्या दिवशी पुन्हा भांडणं झाली. त्यावेळी वाद जास्त विकोपाला गेला, असं साताऱ्यातील आरोपी पतीने सांगितलं आहे.  रागाच्या भरात लाकडी दांडक्याने डोक्यावर घाव घालत त्याने पत्नीची हत्या केल्याचा आरोप आहे.

ठाण्यात स्क्रू ड्रायव्हर खुपसून आईची हत्या

दरम्यान, छातीत स्क्रू ड्रायव्हर खुपसून मुलाने आपल्या सख्ख्या आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना ठाणे जिल्ह्यात उघडकीस आली होती. आरोपी मुलगा कमवलेल्या पैशांची उधळपट्टी करायचा. हत्येच्या दिवशीही पैसे देण्यावरुन मायलेकात वाद झाला. त्यानंतर राग अनावर झाल्याने मुलाने जवळच पडलेला स्क्रू ड्रायव्हर आईच्या छातीत खुपसला. हा वार एवढा गंभीर होता, की आई जागीच गतप्राण झाली. मुंब्रा येथील रेतीबंदर परिसरातून आरोपी मुलाला अटक करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

पत्नीला दारुचं व्यसन असल्याचा राग, साताऱ्यात पतीकडून लाकडी दांडक्याने मारहाण करत खून

आईच्या छातीत स्क्रू ड्रायव्हर खुपसला, ठाण्यात हत्येचा थरार, मुलाला अटक

कोयत्याने वार करत सावत्र आईची हत्या, पुण्यात 17 वर्षीय मुलगा पोलिसांच्या ताब्यात

(Maharashtra Crime News Vasai Son kills Alcoholic mother )

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.