बहिणीला मारहाण करणाऱ्या भाऊजींशी झटापट, चाकू खुपसून मेहुण्याने जीव घेतला

भाऊजीने आपल्या पत्नीला मारण्यासाठी चाकू आणला होता, मात्र मध्ये पडलेल्या मेव्हण्यावरच तो उगारला. अखेर मेहुण्याने कसाबसा स्वतःचा बचाव केला आणि तोच चाकू भाऊजीला भोसकला.

बहिणीला मारहाण करणाऱ्या भाऊजींशी झटापट, चाकू खुपसून मेहुण्याने जीव घेतला
उल्हासनगरात मेहुण्याकडून भाऊजींची हत्या
Follow us
| Updated on: Jun 22, 2021 | 8:46 AM

उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये मेव्हण्याने आपल्या भाऊजींची म्हणजेच बहिणीच्या पतीची हत्या केल्याची घटना घडली आहे. ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमध्ये कॅम्प 3 भागातील सुभाष नगर परिसरात सोमवारी रात्री उशिरा ही घटना घडली. भाऊजी बहिणीला मारहाण करताना झटापट झाली, अखेर भाऊजींनी उगारलेला चाकू मेहुण्याने त्यांनाच खुपसल्याचा आरोप आहे. (Maharashtra Crime Ulhasnagar Brother in law killed Sister’s Husband)

नेमकं काय घडलं?

मयत सचिन खेडेकर हा पत्नी शुभांगी खेडेकर सोबत उल्हासनगरमधील सुभाष नगर भागात वास्तव्याला होता. सचिन हा व्यसनाधीन असल्याचं बोललं जातं. तो सतत पत्नी शुभांगीला मारहाण करायचा. सोमवारी रात्री सुद्धा त्याने पत्नीला मारहाण करायला सुरुवात केली. यावेळी त्याचा मेव्हणा रोशन जाधव हा वाद सोडवण्यासाठी आला.

मेहुण्यावरच चाकू उगारला

दरम्यान सचिनने आपल्या पत्नीला मारण्यासाठी चाकू आणला होता, मात्र सचिनने तो मेहुणा रोशनवरच उगारला. रोशनने कसाबसा स्वतःचा बचाव केला आणि तोच चाकू सचिनला भोसकला. यात सचिनचा जागीच मृत्यू झाला.

आरोपीला अटक

या हत्येची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त आणि मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक घटनास्थळी दाखल झाले आणि संबंधित ठिकाणची पाहणी करून पंचनामा केला. सध्या सचिनचा मृतदेह उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तर हत्या करणाऱ्या रोशनला पोलिसांनी अटक केली आहे.

मध्य प्रदेशातही मेहुण्याकडून भाऊजींची हत्या

दरम्यान, मेहुण्याने बहिणीच्या पतीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार तीन महिन्यांपूर्वी मध्य प्रदेशातही घडला होता. धक्कादायक म्हणजे भाऊजींचं डोकं उडवून मेहुणा पोलिस स्टेशनात दाखल झाला. आपल्या पतीची हत्या झाल्याचं समजल्यानंतर बहिणीनेही आयुष्य संपवलं. बहिणीने पळून जाऊन केलेलं लग्न मान्य नसल्यानेच त्याने ही हत्या केल्याचा आरोप आहे. मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये तिलवारा पोलीस ठाण्याअंतर्गत ही घटना घडली होती.

संबंधित बातम्या :

भाऊजींचं उडवलेलं डोकं घेऊन मेहुणा पोलिस स्टेशनात, बहिणीचीही आत्महत्या

आधी पत्नी मुलांना संपवलं, मग सासू- मेहुणीची हत्या, महाराष्ट्राला हादरवणाऱ्या नागपूरच्या हत्याकांडाची ‘रिअल स्टोरी’

(Maharashtra Crime Ulhasnagar Brother in law killed Sister’s Husband)

Non Stop LIVE Update
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.