Vaishali Bhaisane | माझ्या हत्येचा कट रचलाय, सुप्रसिद्ध गायिका वैशाली भैसनेच्या फेसबुक पोस्टने खळबळ

माझ्या हत्येचा कट रचला जात आहे. 2 दिवसांनंतर पत्रकार परिषद घेऊन याचा गौप्यस्फोट मी करणार आहे. आज मला तुमच्या सपोर्टची गरज आहे, असं आवाहन वैशाली भैसने हिने सोशल मीडियावरुन केलं आहे.

Vaishali Bhaisane | माझ्या हत्येचा कट रचलाय, सुप्रसिद्ध गायिका वैशाली भैसनेच्या फेसबुक पोस्टने खळबळ
गायिका वैशाली भैसनेच्या फेसबुक पोस्टने खळबळ
Follow us
| Updated on: Feb 18, 2022 | 1:15 PM

मुंबई : सुप्रसिद्ध गायिका वैशाली भैसने (Vaishali Bhaisane Mhade) हिने आपल्या जिवाला धोका असल्याचा दावा केला आहे. वैशालीच्या फेसबुक पोस्टमुळे एकच खळबळ उडाली आहे. माझ्या हत्येचा कट रचला जात आहे. 2 दिवसांनंतर पत्रकार परिषद घेऊन याचा गौप्यस्फोट मी करणार आहे. आज मला तुमच्या सपोर्टची गरज आहे, असं आवाहन वैशाली भैसने हिने सोशल मीडियावरुन केलं आहे. त्यानंतर चाहत्यांनी तिला काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. सारेगमप या मराठी गायन रिअॅलिटी शोची विजेती राहिलेल्या वैशालीने 2009 मध्ये हिंदी सारेगमपच्या विजेतेपदाचाही मान पटकावला होता. त्यानंतर ती सूर नवा ध्यास नवा, बिग बॉस मराठी या सारख्या इतर शोमध्येही झळकली. नुकतंच तिने राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरला आहे.

काय आहे वैशाली भैसनेची फेसबुक पोस्ट?

माझ्या हत्येचा कट रचला जात आहे. 2 दिवसांनंतर पत्रकार परिषद घेऊन याचा गौप्यस्फोट मी करणार आहे. आज मला तुमच्या सपोर्टची गरज आहे, असं वैशालीने फेसबुकवर लिहिलं आहे.

पाहा वैशालीची फेसबुक पोस्ट

कोण आहे वैशाली भैसने?

सारेगमप या मराठी गायन रिअॅलिटी शोचे विजेतेपद 2008 मध्ये वैशालीने पटकावले होते. त्यानंतर तिने 2009 मध्ये हिंदी सारेगमपच्या विजेतेपदाचाही मान पटकावला. सोबतच झी टीव्हीशी 50 लाख रुपयांचा संगीत करार, ह्युंदाई i10 कार आणि एलसीडी टीव्ही तिला बक्षीस स्वरुपात मिळाले. सुप्रसिद्ध गायक-संगीतकार हिमेश रेशमियाच्या “रॉक घराणा”ची ती सदस्या होती. सा रे ग म प चॅलेंज 2009 मधील तिच्या संपूर्ण प्रवासात तिने स्वतःला एक अष्टपैलू गायिका असल्याचे सिद्ध केले.

अनेक मालिका-गाण्यांसाठी आवाज

वैशालीने कुलवधू, होणार सून मी ह्या घरची, माझ्या नवऱ्याची बायको यासारख्या लोकप्रिय मराठी मालिकांची शीर्षकगीतं गायली आहेत. 2011 मध्ये तिला रेशमियाने दमादम चित्रपटातील हम-तुम या ड्युएट गाण्यातून बॉलिवूड पदार्पणाची संधी दिली. त्यानंतर बाजीराव मस्तानी सिनेमात श्रेया घोषालच्या साथीने तिने ‘पिंगा’ हे गाणं गायलं. हे गाणं इतकं गाजलं की वैशालीची ‘पिंगा गर्ल’ अशी ओळख निर्माण झाली. त्यानंतर तिने कलंक सिनेमात घर मोरे परदेसिया या गाण्यातही श्रेयासोबत तान छेडली. याशिवाय ती सूर नवा ध्यास नवा, बिग बॉस मराठी सिझन दोन या सारख्या इतर शोमध्येही झळकली होती. नुकताच तिने राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरला आहे.

संबंधित बातम्या :

गांधेली शिवारातील स्त्री-पुरुषाचा मृत्यू होरपळूनच! दोघांचे संबंध काय, अजून रहस्य कायम!

 पिंपरीत पोरीला नांदवायला घेऊन गेलेल्या बापाचा सासरच्यांनी केलेल्या बेदम मारहाणीत मृत्यू

प्रेमाच्या जाळ्यात अडकवून डॉक्टरचा अश्लील व्हिडीओ शूट, तरुणीने सव्वातीन लाख उकळले

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.