VIDEO | गुजराती गायिकेवर नोटांची उधळण, विरारमधील धार्मिक कार्यक्रमात प्रकार

स्वयंचैतन्य शक्तीपीठ आनंद धाम गोशाळाच्या माध्यमातून विरार पूर्वेकडील रायपाडा परिसरातील गोशाळेत हा कार्यक्रम झाला होता. 19 फेब्रुवारी रोजी शनिवारी रात्री 9:30 ते पहाटे 4 वाजेपर्यंत हा कार्यक्रम पार पडला असल्याची माहिती समोर आली आहे.

VIDEO | गुजराती गायिकेवर नोटांची उधळण, विरारमधील धार्मिक कार्यक्रमात प्रकार
गायिकेवर नोटांची उधळण
Follow us
| Updated on: Feb 20, 2022 | 2:49 PM

विरार : गुजराती समाजाच्या धार्मिक कार्यक्रमात नोटा उधळल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रसिद्ध गुजराती गायिकेवर लाखो रुपयांच्या नोटा (Notes thrown on Singer) भिरकावल्याचा दावा केला जात आहे. विरारमध्ये (Virar) धार्मिक कार्यक्रमात पैशांचा पाऊस पाडल्याचं चित्र पाहायला मिळालं. गायिका गाणं गात असताना ताल धरत तिच्या अंगावर शेकडो जणांनी नोटांचे बंडलच्या बंडल उधळल्याची माहिती आहे. नोटांचे बंडल उधळतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल (Viral Video) झाला आहे. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे विरार पोलिसांना याची थोडीसुद्धा कल्पना नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

स्वयंचैतन्य शक्तीपीठ आनंद धाम गोशाळाच्या माध्यमातून विरार पूर्वेकडील रायपाडा परिसरातील गोशाळेत हा कार्यक्रम झाला होता. 19 फेब्रुवारी रोजी शनिवारी रात्री 9:30 ते पहाटे 4 वाजेपर्यंत हा कार्यक्रम पार पडला असल्याची माहिती समोर आली आहे.

व्हिडीओमध्ये काय दिसते

राजस्थानमधील प्रसिद्ध गायिका कच्छ कोकिळा गीताबेन रबारी, संतवणी आराधक गोविंदभाऊ गाढवी, लोकसाहित्यिकार प्रतापदान गाढवी यांच्या गाण्याचा हा धार्मिक कार्यक्रम होता. गाणे चालू असताना एकामागून एक जण येऊन पैशाची उधळण करत असतानाचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

वसई-विरारसह मीरा भाईंदर, पालघर, मुंबई, ठाणे, गुजरात आणि महाराष्ट्राच्या विविध भागातून हजारो गुजराती नागरिकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

माँ भगवती आणि हर्सीता दीदींच्या सहवासात पूर्ण रात्र अशे शीर्षक देत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पण एखाद्या धार्मिक कार्यक्रमामध्ये अशा प्रकारे पैशांची उधळण करुन, समाजाला कोणता संदेश देणार असा प्रश्नच या निमित्ताने निर्माण झाला आहे.

व्हायरल व्हिडीओवर संताप

नोटांचे बंडल उधळतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे विरार पोलिसांना याची थोडीसुद्धा कल्पना नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

…म्हणून कधी चुकीचं काम करू नये, रस्त्यावरून भरकटलेल्यांना ‘या’ काकांनी दाखवला योग्य रस्ता

 खासदार संभाजीराजेंच्या गाडीचं स्टेअरींग महिलेच्या हाती! Viral व्हिडीओमागचा इंटरेस्टिंग किस्सा

दोन हातांनी Tractor उचलतोय हा मुलगा, खरं नाही वाटत! Viral video पाहा आणि तुम्हीच ठरवा

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.