रजनी कुडाळकर आत्महत्येप्रकरणी नवा ट्विस्ट! रजनी कुडाळकरांच्या आत्महत्येला जबाबदार असणारी महिला कोण?
Rajani Kudalkar Suicide case: जिच्यामुळे रजनी कुडाळकर यांनी आत्महत्येचं पाऊल उचललं ती महिला नेमकी कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्याचप्रमाणे नेहरुनगर पोलिसांनी मंगेश आणि रजनी पाटील यांच्या मुलाचीही चौकशी केली आहे.
मुंबई : शिवसेना आमदार (Shiv sena MLA) मंगेश कुडाळकरांच्या पत्नीच्या आत्महत्येनं (Mangesh Kudalkar wife suicide case) खळबळ उडाली होती. दरम्यान, ही आत्महत्या नेमकी का करण्यात आली, याचं गूढ आता अधिकच वाढलंय. कारण रजनी कुडाळकर (Rajani Kudalkar) यांनी आत्महत्या करण्याआधी केलेल्या एका मेसेजमुळे अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. रजनी कुडाळकर यांनी आत्महत्येआधी एक मेसेज केला होता. हा मेसेज रजनी कुडाळकर यांनी आपल्याला मुलाला केला होता. या मेसेजमध्ये रजनी कुडाळकर यांनी आपल्या आत्महत्येला जबाबदार कोण आहे, याबाबत लिहिलं होतं. पोलिसांना हा मेसेज मिळाला असून आता मुंबई पोलिस या अनुशंगानं चौकशी करत आहेत. नेहरु नगर पोलिसांकडून याप्रकरणी तपास केला जातो आहे. रजनी कुडाळकर यांनी आत्महत्येपूर्ण केलेल्या मेसेजमध्ये एका महिलेचं नाव लिहिलं होतं. माझं काही बरं वाईट झाल्यास त्याला ही महिला जबाबदार असेल, असा मेसेज रजनी कुडाळकर यांनी केला होता.
मेसेज नेमका कुणाला?
शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांची पत्नी रजनी कुडाळकर यांनी आपल्या मुलाला मेसेज पाठवला होता. आपलं काही बरं वाईट झालं, तर त्याला जबाबदार (संबंधित महिलेचं नाव लिहीत) महिला असेल, असं रजनी कुडाळकर यांनी म्हटलं होतं. रजनी कुडाळकर यांच्या आत्महत्येनंतर समोर आल्या या मेसेजनं या आत्महत्या प्रकरणाला नवा ट्वीट आलाय. तसंच अनेक प्रश्नही यामुळे आता उपस्थित केले जात आहेत.
संबंधित महिला कोण?
दरम्यान, जिच्यामुळे रजनी कुडाळकर यांनी आत्महत्येचं पाऊल उचललं ती महिला नेमकी कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्याचप्रमाणे नेहरुनगर पोलिसांनी मंगेश आणि रजनी पाटील यांच्या मुलाचीही चौकशी केली आहे. रजनी कुडाळकर यांनी आपल्या मुलालाच हा मेसेज पाठवला होता. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या मुलाचाही जबाब नोंदवून घेतलाय.
किचनमध्ये गळफास
रजनी कुडाळकर यांनी किचनमध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. त्यांच्या आत्महत्येनं सगळ्यांना धक्का बसला होता. रविवारी रात्रीच्या सुमारास ही धक्कादायक घटना उघडकीस आली होती. कुडाळकर कुटुबीय हे कुर्ला नेहरुनगरमध्ये राहायला होते. राजी नऊ वाजण्याच्या सुमारात त्यांनी आपली जीवनयात्रा संपली होती.
कोण आहे मंगेश कुडाळकर?
मंगेश कु़डाळकर हे आमदार आहे. ते कुर्ला विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. मंगेश कुडाळकर यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आलेली होती. मंगेश कुडाळकर यांच्या पत्नीनं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्यानं अनेकांना धक्का बसला होता. सध्या या आत्महत्येप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
पाहा व्हिडीओ :
संबंधित बातम्या :
आयुष्यभर ज्या विद्युत खांबावर कर्तव्य बजावलं, त्यावरच जीवन संपवलं, पाथरीत विचित्र आत्महत्या!
पुण्यात आठ वर्षीय मुलाची डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून हत्या
उल्हासनगरात गर्लफ्रेंडवरून दोन गटात तुंबळ हाणामारी, भररस्त्यात फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडीओ