Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rahul Narvekar : ‘बांधा बिनधास्त झोपड्या’ कुलाब्यात राहुल नार्वेकरांच्या नावाने कुणी पसरवली अफवा? 40 जणांना बेड्या

Manora Amdar Nivas News : मनोरा आमदार निवासस्थान पाडण्यात आलंय. तिथे नवं आमदार निवास लवकरच बांधलं जाणार आहे.

Rahul Narvekar : 'बांधा बिनधास्त झोपड्या' कुलाब्यात राहुल नार्वेकरांच्या नावाने कुणी पसरवली अफवा? 40 जणांना बेड्या
कुलाब्यात नेमकं काय घडलं?
Follow us
| Updated on: Jul 07, 2022 | 7:26 AM

मुंबई : राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांची रविवारी विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली. राहुल नार्वेकर हे कुलाबा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. त्यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतरच्या अवघ्या 72 तासांच्या आतच त्याच्या नावाने कुलाब्यात एक विचित्र अफवा पसरवण्यात आली. राहुल नार्वेकर यांनी मनोर आमदार निवासाचा (Manora Amdar Nivas) भूखंड गरिबांना झोपड्या बांधण्यासाठी दिल्याची अफवा पसरवण्यात आलेली होती. त्यानंतर कफ परेड परिसरात अनेक लोकांनी गर्दी केला. बांबू, काठ्या, ताडपत्री घेऊन मनोराच्या भूखंडावर जमल्यानंच गोंधळ उडाला होता. या संपूर्ण प्रकाराची माहिती जेव्हा पोलिसांनी मिळाली, तेव्हा कफ परेड पोलिसांनी (Colaba police station) घटनास्थळी धाव घेली. सरकारी जागेवर अतिक्रमण करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एकूण 40 जणांना पोलिसांनी अटकही केली. तसंच गुन्हाही नोंदवला. अचानक जमावर आल्यानं मनोरा येथे कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा रक्षकाने पोलिसांना याबाबत कळवलं. त्यानंतर पोलिसांनी प्रसंगावधान राखत परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र या संपूर्ण प्रकारामुळे एकच गोंधळ उडाला होता.

आमदार निवास भूखंडावर कुणाचा डोळा?

मनोरा आमदार निवासस्थान पाडण्यात आलंय. तिथे नवं आमदार निवास लवकरच बांधलं जाणार आहे. मात्र सध्या हा भूखंड मोकळा आहे. त्यामुळे झोपडपट्टी वाल्यांचा या भूखंडावर डोळा असल्याचं बुधवारी दिसून आलं. या भूखंडावर झोपड्या बांधण्याबाबत कफ परेडच्या आजूबाजूच्या परिसरातीलील लोकांना कुठूनतरी माहिती मिळाली आणि त्यांनी मनोरा आमदार निवसाच्या मोकळ्या भूखंडावर एकच गर्दी केली होती.

विधानसभा अध्यक्षांकडूनही कारवाईचे आदेश

दरम्यान, सुरुवातील विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनाही याबाबत कोणतीच कल्पना नव्हती. मात्र जेव्हा त्यांना हा प्रकार कळला, तेव्हा त्यांनीही पोलिसांनी याची माहिती दिली आणि संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले.

हे सुद्धा वाचा

झोपड्या बांधण्याबाबतची अफवा पसरतात प्रत्येक जण मिळेल ती जागा निवडत होता, तसंच समिनी आखणी करुन झोपडीसाठी आणलेलं साहित्य टाकून कब्जा करुन लागला होता. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेतली आणि अतिक्रमण करण्याच्या प्रयत्न असलेल्यांना ताब्यात घेत गुन्हाही नोंदवलाय.

महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग..
महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग...
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ.
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट.
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते.
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट.
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी.
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे.
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले.
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली.
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण.