7 वर्षांच्या मुलीला विष देऊन मारलं! विषप्राशन केलेले आईबाप वाचले, जन्मदात्यांवर हत्येचा गुन्हा

मुंबई-अहमदाबाद हायवेवर असलेल्या सीसन्स नावाच्या हॉटेलमध्ये एका मुलीचा मृतदेह आढळून आला होता.

7 वर्षांच्या मुलीला विष देऊन मारलं! विषप्राशन केलेले आईबाप वाचले, जन्मदात्यांवर हत्येचा गुन्हा
धक्कादायक घटनाImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 01, 2022 | 6:36 PM

मीरारोड : सात वर्षांच्या मुलीसह आपल्या पत्नीलाही जीवे मारण्याचा (Murder Case) प्रयत्न करुन पती फरार झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. या घटनेप्रकरणी आता खळबळजनक खुलासा करण्यात आलाय. मंगळवारी याप्रकरणी पोलिसांनी पित्यासह आईवरही (Mother Father booked) हत्येचा गुन्हा नोंदवलंय. 39 वर्षांच्या एका माणसानं आपल्या पत्नीसह मुलीची हत्या करुन दोघांनीही आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलण्याचं ठरवलं होतं. पण मुलीच्या हत्येनंतर (Mira road murder) पतीनं पळ काढला होता. पण पत्नी गंभीर जखमी झाली होती. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं. सुरुवातील या घटनेप्रकरणी फक्त पतीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला होता. त्यानंतर आता सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं पोलिसांना मिळालेल्या धक्कादाय माहितीनंतर आई आणि वडील अशा दोघांवरही हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. आपल्याच मुलीची हत्या केल्याचा ठपका या मातापित्यांवर ठेवण्यात आलाय.

खळबळजनक खुलासा

काशिमीरा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी सुदर्शन पोतदार यांनी हिंदुस्थान टाईम्सला दिलेल्या माहितीत या घटनेबाबत महत्त्वाची दिली. सोमवारी ही घटना उघडकीस आली होती. मुंबई-अहमदाबाद हायवेवर असलेल्या सीसन्स नावाच्या हॉटेलमध्ये एका मुलीचा मृतदेह आढळून आला होता.

आत्महत्येचा प्रयत्न फसला

सीसन्स हॉटेलच्या एका रुपमध्ये पूनम तिचा पती रिया ब्रॅको आणि या दोघांची सात वर्षांची लेक तीन दिवसांपासून राहत होते. सोमवारी पूनमचा जोरात ओरडण्याचा आवाज ऐकून हॉटेलचा सगळा स्टाफ रुमजवळ एकवटला होता. तेव्हा सात वर्षांच्या मुलीचा मृतदेह पाहिल्यानंतर सगळेच हादरुन गेले होते. ही घटना उघडकीस येण्याआधीच पती रायन ब्राको यांनी पळ काढला होता.

हे सुद्धा वाचा

यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिलं. मीरारोड पोलिसांना रायन रेल्वे स्टेशनजवळच्या एका लॉजवर दारु प्यायलेल्या अवस्थेत आढलून आला होता. दरम्यान, तीन दिवसांपासून ते आपल्या मुलीच्या मृतदेहासोबत राहत होते. विष देऊन आपल्या मुलीची हत्या केली असल्याचं पोलिसांच्या तपासातून समोर आलंय. कर्जबाजारी झालेल्या या दाम्पत्यानं आर्थिक नैराश्यातून मुलीला संपवल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय.

आर्थिक संकटानं अधिकच अडचणीत आणलं

वसई या दाम्पत्यानं घेतलेलं घरही जवळपास तीन हून अधिक लाखांना विकलं होतं. थकलेली बिलं या रकमेतून त्यांनी भरली होती. पण तरिही चार लाख रुपयांचं कर्ज त्यांच्या डोक्यावर होतं. तिघांनीही विष घेऊन आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतला होता. तिघांनीही जेवणातून विष घेतलं होतं. त्यात पती-पत्नी दोघंही वाचले. पण मुलीचा अंत झाला होता. पूनमला उलटीचा त्रास सुरु झाला होता. तर रायनला जुलाब होत होते.

रायन हा प्रोडक्शन मॅनजर म्हणून मुंबईतल्या एका मोठ्या प्रोडक्श्न हाऊसमध्ये काम करत होतं. त्याची नोकरी एप्रिल महिन्यात गेली होती. तर पूनम एका शाळेत पायमरी टीचर म्हणून काम करत होती.

सध्या पूनम टेम्भा सिविक रुग्णलयात असून तिची प्रकृती अजूनही स्थिर नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर मुलीचा पोस्ट मॉर्टेम रिपोर्ट जेजे रुग्णालयात येण्याची पोलिसांना प्रतीक्षा आहे. कलम 302 अंतर्गत आई-बापाविरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.