Police Officer Crushed : पोलीस अधिकाऱ्याला कारखाली चिरडणाऱ्या तिघांना जन्मठेप; मोक्का कोर्टाचा निकाल
या प्रकरणातील आरोपी पूर्वनियोजित कट करून इंडिकाने घटनास्थळी आल्याचे स्पष्ट होते, असे न्यायालयाने निकालपत्रात म्हटले आहे. आरोपींनी क्रूर रीतीने वर्तन केले आहे. आरोपी कारमध्ये होते हे फिर्यादीने सिद्ध केले होते. दरोडा टाकत असताना त्यांना रोखण्याचा प्रयत्न करणारे पोलिस अधिकारी सरनोबत यांना कारने खाली पाडले होते. त्यात त्यांना आपला जीव गमवावा लागला होता.
मुंबई : दरोड्याचा प्रयत्न करणाऱ्या दरोडेखोरांनी एका पोलीस अधिकाऱ्याला भरधाव कारखाली चिरडल्याची घटना 2012 मध्ये खेरवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. या प्रकरणात मुंबईतील विशेष मोक्का न्यायालया (Special Mocca Court)ने निकाल दिला आहे. न्यायालयाने यातील तीन आरोपींना जन्मठेपे (Life Imprisonment)ची शिक्षा सुनावली आहे. तसेच तिघांना प्रत्येकी 16 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. रस्त्यांवर, नाक्यांवर बंदोबस्त देणाऱ्या पोलिसांच्या बाबतीत अतिरेकी वागणाऱ्या लोकांसाठी न्यायालयाचा हा निकाल मोठा झटका देणारा मानला जात आहे. 10 वर्षांनंतर निकाल देताना गुन्ह्याचे गंभीर स्वरूप घेत न्यायालयाने आरोपींना कुठलीही सहानुभूती देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. (Mocca court sentences three to life-imprisonment for crushing police officer)
वांद्रा पूर्वेकडील खेरवाडी पोलीस ठाण्यातील सहाय्यक उपनिरीक्षक दत्तू सरनोबत यांना आरोपींनी गाडीखाली चिरडले होते. यात दत्तू सरनोबत हे मागील बाजूस पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. ते लगेचच बेशुद्ध झाले होते. घटनेच्या 15 दिवसांनंतर त्यांच्या मेंदूला इजा झाल्याचे आढळून आले होते. त्या गंभीर दुखापतीमुळे सरनोबत हे मरण पावले होते. 15 दिवसांत ते शुद्धीवर आलेच नव्हते.
वांद्रे रेल्वे पुलाखाली पहाटेच्या सुमारास घडली होती घटना
31 ऑगस्ट 2012 रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास सरनोबत आणि खेरवाडी पोलिस स्टेशनचे मोबाईल व्हॅन चालक चंद्रकांत शिंदे आणि पोलिस कर्मचारी प्रकाश बर्वे पेट्रोलिंग ड्युटीवर असताना ही घटना घडली. ते वांद्रे रेल्वे पुलावरून पुढे जात होते. त्यावेळी बाजूला उभी असलेली एक पांढरी इंडिका कार आणि लाल रंगाची होंडा डिझायर त्यांच्या नजरेस पडली. तेथे एक माणूस बाहेर उभा होता. पोलिसांना त्या गाड्यांबाबत संशय आला. यावेळी एएसआय सरनोबत यांनी शिंदे यांना त्यांची व्हॅन लाल रंगाच्या गाडीसमोर थांबवण्यास सांगितले. त्यानंतर बर्वे आणि सरनोबत लाल रंगाच्या कारच्या दिशेने जात होते. यावेळी गाडी चालवणाऱ्या व्यक्तीने गाडी चालवत सरनोबत यांना खाली पाडले आणि कारमधील अन्य तीन साथीदारांसह वेगाने पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी उभ्या असलेल्या व्यक्तीला विचारले. त्यावर त्याने आपण लाल कारचा ड्रायव्हर असल्याचे सांगितले होते. मी शौचालयात गेलो होतो. तेथून कारकडे परतत असताना इंडिकामध्ये आलेल्या तलवारधारी चौघांनी माझी कार लुटली होती, असे त्या व्यक्तीने पोलिसांना सांगितले.
आरोपींना कुठलीही सहानुभूती दाखवून चालणार नाही – न्यायालय
या प्रकरणातील आरोपी पूर्वनियोजित कट करून इंडिकाने घटनास्थळी आल्याचे स्पष्ट होते, असे न्यायालयाने निकालपत्रात म्हटले आहे. आरोपींनी क्रूर रीतीने वर्तन केले आहे. आरोपी कारमध्ये होते हे फिर्यादीने सिद्ध केले होते. दरोडा टाकत असताना त्यांना रोखण्याचा प्रयत्न करणारे पोलिस अधिकारी सरनोबत यांना कारने खाली पाडले होते. त्यात त्यांना आपला जीव गमवावा लागला होता. हे लक्षात घेता आरोपींना कुठलीही सहानुभूती दाखवून चालणार नाही, असेही न्यायालयाने नमूद केले. न्यायालयाने तिघांना प्रत्येकी 16 लाख रुपयांचा दंड ठोठावत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. (Mocca court sentences three to life-imprisonment for crushing police officer)
इतर बातम्या
Triple Murder | आजी, मुलगा आणि नातवाचा निर्घृण खून, उधारीच्या वादातून तिहेरी हत्याकांड
Murder | सोयरिकीतील मध्यस्थाकडून वधूपित्याचा खून, बुलडाण्यातील हत्येचं गूढ उकललं