बॉडी बिल्डर मनोज पाटील आत्महत्येचा प्रयत्न प्रकरण, हायकोर्टाचा साहिल खानला दिलासा

मनोज पाटीलने काही दिवसांपूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केला होता आणि अभिनेता साहिल खान हे टोकाचं पाऊल उचलण्यासाठी जबाबदार असल्याचे सांगितले होते. ओशिवरा पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर देखील नोंदवला आहे, परंतु साहिल खानला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

बॉडी बिल्डर मनोज पाटील आत्महत्येचा प्रयत्न प्रकरण, हायकोर्टाचा साहिल खानला दिलासा
मिस्टर इंडिया मनोज पाटील (डावीकडे), अभिनेता साहिल खान (उजवीकडे)
Follow us
| Updated on: Sep 28, 2021 | 2:38 PM

मुंबई : ‘मिस्टर इंडिया’ किताब विजेता बॉडी बिल्डर मनोज पाटील (Mr India Manoj Patil) याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात बॉलिवूड अभिनेता साहिल खानला (Sahil Khan) अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. सत्र न्यायालयाने साहिल खानचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर त्याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर बॉम्बे हायकोर्टाने साहिल खानला अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर करत दिलासा दिला आहे.

ओशिवरा पोलीस स्टेशनला मनोजची धडक

साहिल खानला अटक करावी, अशी मागणी करत बॉडी बिल्डर मनोज पाटील याने चार दिवसांपूर्वी आपल्या समर्थकांसह मुंबईतील ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये धडक दिली होती. मनोज पाटीलने काही दिवसांपूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केला होता आणि अभिनेता साहिल खान हे टोकाचं पाऊल उचलण्यासाठी जबाबदार असल्याचे सांगितले होते. ओशिवरा पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर देखील नोंदवला आहे, परंतु साहिल खानला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

मला संपवण्यासाठी साहिल खानने षडयंत्र रचल्याचा दावा मनोज पाटीलने त्याआधी केला होता. आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर मनोज पाटीलने पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली होती. साहिल खान जाणून-बुजून माझ्यावर आरोप करत आहे. त्यांचा एक ग्रुप मला छळत होता, याचा मानसिक त्रास झाल्यामुळे मी टोकाचं पाऊल उचललं. देशाचे नाव मोठे करण्यासाठी मला ऑलम्पियाची तयारी करायची होती, परंतु आपले स्वप्नभंग व्हावे म्हणूनच त्याने हा प्रकार केल्याचे पत्रकार परिषदेदरम्यान मनोज पाटीलने सांगितले होते.

मनोज पाटीलने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर विश्वास व्यक्त केला असून कृष्णकुंजवर जाऊन आपल्याला योग्य न्याय मिळेल अशी अपेक्षाही त्याने व्यक्त केली होती.

काय आहे प्रकरण?

मिस्टर इंडिया मनोज पाटील (Mr India Manoj Patil) याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना 16 सप्टेंबरला सकाळी उघडकीस आली होती. विषारी गोळ्या खाऊन 29 वर्षीय मनोजने आपलं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. 15 सप्टेंबरला रात्री उशिरा कुटुंबियांनी त्याला मुंबईतील कूपर रुग्णालयात दाखल केलं.

साहिल खानविरोधात याआधी मनोजने पोलिसांकडे तक्रार केलेलं पत्रही समोर आलं आहे. अभिनेता साहिल खान माझ्यावर जळतो, साहिल माझ्या न्युट्रिशन शॉपविषयी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून अपप्रचार करतो, तसेच माझं करिअर संपवण्याची धमकी देतो, असा आरोप मनोजने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत आहे.

कोण आहे मनोज पाटील?

मनोज पाटीलने 2016 मध्ये ‘मिस्टर इंडिया मेन्स फिजिक ओव्हरऑल चॅम्पियनशिप’ (Mr India Men’s Physique Championship) हा किताब पटकावला होता. तो एक सुप्रसिद्ध मॉडेल, अॅथलीट आणि ट्रेनरही आहे.

मनोज पाटीलचे आरोप काय?

“साहील खान नामक एक इन्फ्लुएन्सर आहे. तो काही दिवसांपासून इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे मला आणि माझ्या न्यूट्रिशन शॉपला टार्गेट करत आहे. त्यामुळे मला आणि माझ्या परिवाराला त्याचा खूप त्रास झाला आहे. मी एका मिडल क्लास फॅमिलीला बिलाँग करतो आणि माझ्या झालेल्या प्रगतीमुळे त्याला खूप जलस फील होत असल्यामुळे तो माझ्या आणि माझ्या शॉपबद्दल सोशल मीडियावर खूप काही बोलला आहे. त्याच्याद्वारे मला खूप धमक्या सुद्धा दिल्या गेल्या आहेत, की तुझं करिअर मी संपवून टाकेन. किंबहुना तो माझ्या बिल्डिंगखाली सुद्धा येऊन गेला. मला नाही माहित त्याच्यामागे त्याचा काय उद्देश होता.” असं मनोजने पत्रात लिहिलं होतं.

“हे सगळं चालू असताना आता तर तो माझ्या वाईफला घेऊन प्लॅन करतोय, की माझ्यावर माझ्या बायकोद्वारे काहीही अशी केस करुन मला अडकवायचं आणि मला कोर्ट कचेरीमध्ये ठेवून माझा यूएसएचा विजा कायमचा बरखास्त करायचा. कारण मला आता मिस्टर ऑलिम्पिया खेळण्यासाठी यूएसएला जायचंय. माझ्या आणि माझ्या वाईफमध्ये असलेल्या अनबनीचा फायदा घेऊन तिचा माईंड डायवर्ट करुन मला फसवून माझं करिअर कायमचं संपवायचं. आता हे सगळं पाहून मी आणि माझी फॅमिली खूप त्रस्त झालो आहोत. माझ्या घरी मी एकच कमवता मुलगा आहे आणि माझी आई हाऊसवाईफ आणि बाबा 65 वर्षांचे रिटायर्ड आहेत.” असंही मनोजने सांगितलं.

“मला हा सगळा छळ पाहता आता खरंच सुसाईड करायला तो भाग पाडत आहे, असाच माझा छळ चालू राहिला तर येत्या काही दिवसात मी माझ्या जीवाचे काहीही बरेवाईट करुन घेणार आणि त्यानंतर या गोष्टीची पूर्ण जिम्मेदारी सरकार, पोलीस आणि साहिल खान याची असणार” असं मनोज पाटीलने पोलिसांना लिहिलेल्या पत्रात आढळलं आहे.

कोण आहे साहिल खान?

साहिल खान एक बॉलिवूड चित्रपट अभिनेता, फिटनेस उद्योजक आणि यूट्यूबर आहे. फिटनेसविषयक जागरूकता वाढवण्यासाठी तो ओळखला जातो आणि त्याने मुंबईतील अनेक संस्थांकडून पुरस्कार पटकावले आहेत.

साहिल खानचा दावा काय?

“बॉडी बिल्डर राज फौजदारच्या मदतीसाठी मी समोर आलो होते. राज फौजदारला एक्सपायर झालेले स्टेरॉईड मनोज पाटीलने विकले होते. राज फौजदारचा व्हिडीओ मी सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर आता सहानुभूती मिळवण्यासाठी मनोजने सुसाईड नोट लिहून आत्महत्येचा प्रयत्न केला” असा आरोप साहिल खानने केला आहे. “मनोज पाटील आणि राज फौजदार यांच्यामधील वाद आहे” असं साहिन खान पत्रकार परिषद घेऊन म्हणाला होता.

साहिल खानने शेअर केलेल्या व्हिडीओत नेमकं काय?

साहिल खानने त्याच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर बॉडी बिल्डर राज फौजदार याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तो मनोज पाटीलला फोन करताना दिसतो. तसेच व्हाट्सअॅपवर चॅट करताना दिसतो. त्यानंतर तो फोनवर बातचितही करतो. यावेळी तो एक्स्पायर झालेल्या स्टेरॉईडचे दोन लाख रुपये मागतो. त्यावर मनोज कंपनीकडे तक्रार करुन पैसे मागवत असल्याचं बोलताना दिसत आहे. यावेळी दोघांमध्ये बाचाबाची होते. तसेच या व्हिडीओत राज फौजदार आपल्याला सपोर्ट करा, असं आवाहन प्रेक्षकांना करताना दिसतोय.

संबंधित बातम्या :

मि. इंडिया मनोज पाटीलनं सुसाईडचा प्रयत्न का केला? आरोपाच्या घेऱ्यात असलेला अभिनेता साहिल खान नेमका काय म्हणतो? 

“साहिल खान मनसेच्या कार्यालयात आला नाही, तर…” मनोज पाटील प्रकरणात मनसेची उडी

Manoj Patil | अभिनेता साहिल खान माझ्यावर जळतो, मिस्टर इंडिया मनोज पाटीलचा आत्महत्येचा प्रयत्न

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.