Mulund : शाळेच्या प्रांगणात खेळायला आलेल्या 6 वर्षांच्या मुलीवर अत्याचार! शालेय कर्मचाऱ्याला बेड्या

Mulund crime : दुपारच्या सुमारास सहा वर्षांची चिमुकली शाळेच्या प्रांगणात खेळण्यासाठी आली होती त्यादरम्यान, या मुलीवर शाळेच्या कर्मचाऱ्यानं अतिप्रसंग केला.

Mulund : शाळेच्या प्रांगणात खेळायला आलेल्या 6 वर्षांच्या मुलीवर अत्याचार! शालेय कर्मचाऱ्याला बेड्या
मुलुंडमध्ये खळबळImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 24, 2022 | 11:32 AM

मुंबई : मुलींच्या सुरक्षेचा (Girls Safety) मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आणणारी एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. एका सहा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार (Girl Molestation) करण्यात आला. या अत्याचार प्रकरणी पोलिसांनी (Mumbai Police News) एकाला अटकही केली. धक्कादायक बाब म्हणजे एका शाळेतच हा धक्कादायक प्रकार घडलाय. मुलुंडमधील शाळेत घडलेल्या या प्रकरांने सगळेच धास्तावलेत. सोमवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तातडीनं या प्रकरणी शाळेच्या कर्मचाऱ्याला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या शाळेतील कर्मचाऱ्याची सध्या पोलिसांकडून कसून चौकशी केली जातेय.

नेमकं काय घडलं?

सोमवारी दुपारी दोन वाजता मुंबईच्या मुलुंड परिरात ही घटना घडली. दुपारच्या सुमारास सहा वर्षांची चिमुकली शाळेच्या प्रांगणात खेळण्यासाठी आली होती त्यादरम्यान, या मुलीवर शाळेच्या कर्मचाऱ्यानं अतिप्रसंग केला. या मुलीला आधी शाळेच्या कर्मचाऱ्यानं चॉकलेटचं आमीष दाखवलं आणि त्यानंतर तिच्यासोबत दृष्कृत्य केलंय.

हे सुद्धा वाचा

याप्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून तातडीनं कारवाई केली. शाळेच्या कर्मचाऱ्याला ताब्यात घेण्यात आलं असून त्याची चौकशी सुरु आहे. मुलुंडच्या नवघर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर मुलुंड परिसरात एकच खळबळ उडालीय.

मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर..

धक्कादायक बाब म्हणजे याआधी देखील अल्पवयीन मुलीवर चॉकेलटच्या बहाण्यानं अतिप्रसंग करण्यात आल्याच्या घटना समोर आलेल्या. त्यापार्श्वभूमीवर काळजी घेण्याच आणि सतर्कता बाळण्याचं आवाहनही केलं जातंय. मात्र मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा यानिमित्ता पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शाळेच्या आवारतच ही घटना घडली असल्याकारणानं पालकही धास्तावले आहेत. आता याप्रकरणी नेमकी काय कारवाई आरोपीवर केली जाते, हे पाहणं महत्त्वाचंय.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.