Mumbai : 60 मिनिटांत छातीत घुसलेली सळई काढली, डॉक्टरांमुळे 22 वर्षीय तरुण जखमी मजुराला अखेर जीवदान

Mumbai BMC Hospital Chest Operation: सुदैवानं या तरुणाच्या छातीत घुसलेली सळई ही फुप्फुसांपर्यंत पोहोचलेली नव्हती. त्यामुळे थोडक्यात मोठा अनर्थ टळला होता.

Mumbai : 60 मिनिटांत छातीत घुसलेली सळई काढली, डॉक्टरांमुळे 22 वर्षीय तरुण जखमी मजुराला अखेर जीवदान
मजुराला जीवदानImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 08, 2022 | 7:45 AM

मुंबई : वांद्रेमध्ये काम करतेवेळी एका तरुणाच्या छातीत अचानक सळई घुसली. ही सळई वेळीच काढली गेली नसती, तर तरुण मजुराचा जीवही जाण्याची भीती होती. अशावेळी पालिका रुग्णालयातील (BMC Hospital) डॉक्टरांनी आपलं कौशल्य पणाला लावत अखेर ही सळई काढली. ऑपरेशन (Chest Operation) करत अवघ्या 60 मिनिटांत ही सळई काढण्यात आल्यामुळे 22 वर्षांच्या तरुण मजुराचे प्राण अगदी थोडक्यात वाचलेत. पालिका डॉक्टरांनी दाखवलेल्या तत्परतेनं या तरुणाला जीवदान मिळाल्यानं, सर्वच स्तरातून डॉक्टरांचं कौतुक केलं जातंय. सध्या या तरुण मजुराला रुग्णालयातच निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं असून त्याची प्रकृती आता स्थिर असल्याचं कळलंय. वांद्रेमध्ये (Bandra, Mumbai News) 26 जुलैला या तरुणाच्या छातीत सळई घुसली होती. कामानिमित्त झाडावर चढला असता तो तोल जाऊन पडला होता. त्यावेळी संरक्षक पुंपणावर लावलेली सळई या तरुणाच्या थेट छातीत घुसली होती. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

छातीत सळई घुसून रक्तबंबाळ

जखमी 22 वर्षीय मजुराला वांद्रेतील पालिकेच्या भाभा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. झाडावरुन पडतेवेळी हा तरुण छातीच्या बाजूने कोसळला होता. खाली पडत असताना तरुण थेट संरक्षक भिंतीसाठीच्या पुंपणावर कोसळून जखमी झाला होता. यात सळईही तुटली आणि तरुणाच्या छातीत घुसून तो रक्तबंबळा झाला होता. जमिनीवर कोसळलेल्लाय तरुणाला तातडीने त्याच्या इतर सहकाऱ्यांनी रुग्णालयात दाखल केलं. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या तरुणावर तातडीने शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचं लगेचच डॉक्टरांच्या लक्षात आलं.

हे सुद्धा वाचा

..थोडक्यात वाचला होता

सुदैवानं या तरुणाच्या छातीत घुसलेली सळई ही फुप्फुसांपर्यंत पोहोचलेली नव्हती. त्यामुळे थोडक्यात मोठा अनर्थ टळला होता. मात्र तरिही सळई काढताना डॉक्टरांना तारेवरची कसरत करावी लागणार होती. कारण सळई घुसून या तरुणाची एक बरगडी तुडली होती. रक्तस्त्रावही थांबलेला नव्हता. तरुण मजुराची प्रकृती चिंताजनक होत चालली होती. त्यामुळे अखेर डॉक्टरांनी आपलं कौशल्य पणाला तासाभराच्या ऑपरशेनने ही सळई बाहेर काढली आणि तरुणाला जीवदान दिलं.

शल्यचिकित्सा विभागाचे वरीष्ठ सल्लागार असलेले डॉक्टर विनोद खाडे, अमित देसाई, श्रद्धा भोने यांनी ही शस्त्रक्रिया केली. तर त्यांना मानसी सरवणकर, रेश्मा पाटील या परिचारीकांच्या पथकानं मदत केली. तर भूलतज्ज्ञ डॉक्टर वरुण नाईक आणि सोनाली कागडे यांनी रुग्णाला भूल दिली होती. आपले प्राण वाचवल्याबद्दल तरुणानेही डॉक्टरांचे आभार मानलेत.

सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....