परदेशी पाहुणीसमोरच टॅक्सी चालकाचे गुत्पांगासोबत टॅक्सीतच घृणास्पद कृत्य!
ती यूएसवरुन आली होती, काम संपवून घरी जात असताना तिला आलेला अनुभव हादरुवून टाकणारा
मुंबई : यूएसमधून कामानिमित्त मुंबईत आलेल्या महिलेसोबत नुकतीच एक संतापजनक घटना घडली. काम आटोपून परतत असताना टॅक्सीमध्ये या महिलेसोबत नको तो प्रकार घडला. टॅक्सी चालकाने या महिलेसमोरच स्वतःच्या गुप्तांगासोबत घृणास्पद कृत्य केलं. ही बाब महिलेच्या लक्षात येताच तिनं टॅक्सीतील पॅनिक बटण दाबलं आणि त्यानंतर ही महिला लगेचच टॅक्सीतून खाली उतरली. शनिवारी रात्री हा प्रकार घडला. अंधेरीतील डीएन नगर पोलिसांनी या प्रकाराबाबत टॅक्सी चालकाला अटक केलीय. अटक करण्यात आलेल्या टॅक्सी चालकाचं नाव योगेंद्र उपाध्याय असं आहे.
40 वर्षीय परदेशी महिला महिन्याभरापूर्वी भारतात आली होती. कामानिमित्त ती मुंबईत थांबली होती. शनिवारी ही महिला आपल्या इतर सहकाऱ्यांसोबत काम संपवून निघाली होती.
कामावरुन परण्यासाठी तिने एक खासगी गाडी बुक केली होती. वाटेत या महिलेसोबत असलेले तिचे सहकारी इच्छीत स्थळी उतरले. त्यानंतर ही महिला आणि टॅक्सीचा चालकच फक्त गाडीत होते.
या प्रवासात महिला चालकाच्या शेजारीच बसलेली होती. दरम्यान, महिलेनं पोलिसांत दिलेल्या तक्रारीत चालकावर सनसनाटी आरोप केले आहेत. या महिलेनं केलेल्या तक्रारीवरुन चालकावर 354 अ आणि 509 कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसंच चालकाला पोलिसांनी ताब्यातही घेतलंय.
तक्रारदार परदेशी महिला अंधेरी पश्चिमेला जाणार होता. पण त्यादरम्यानच चालकाने महिलेसमोरच स्वतःच्या गुप्तांगासोबत घृणास्पद कृत्य करण्यास सुरुवात केली होती.
ही बाब महिलेच्या लक्षात येताच तिने चालकाला गाडी थांबवायला सांगितली. त्यानंतर महिला जेपी रोड इथं खाली उतरली. महिलेनं मदतीसाठी आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूचे लोक टॅक्सीजवळ धावले आणि त्यांनी चालकाला ताब्यात घेतलं.
सदर घटनेची माहिती कुणीतरी डीएन नगर पोलिसांना कळवली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चालकाला आपल्या ताब्यात घेतलं. त्यानंतर तक्रार नोंदवून घेत गुन्हाही दाखल केला.
आरोपी चालक उपाध्याय याचंही वय 40 वर्ष आहे. तो कोणत्याही गुन्हेगारी पार्श्वभूमीचा नसल्याचं पोलिसांनी म्हटलंय. गोरेगाव येथे आरोपी उपाध्याय हा राहणारा असल्याचीही माहितीही पोलिसांनी दिली.
दरम्यान, याआधी 2016 सालीदेखील अशाच प्रकार घटना समोर आली होती. एका विदेशी महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एका टॅक्सी चालकाला अटक करण्यात आली होती. ज्या ऍपवरुन या महिलेनं टॅक्सी बुक केली होती, त्या ऍप कंपनीने नंतर आरोपी टॅक्सी चालकाचा कामावरुन काढून टाकलं होतं.
शाहबाझ असं त्या आरोपी टॅक्सी चालकाचं नाव होतं. सोशल मीडियात या प्रकरणी वाचा फोडल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं होतं. आता 6 वर्षांनी मुंबईत आणखी एक संतापजनक प्रकार समोर आलाय.