Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विवाहित पुरुषासोबत प्रेमसंबंध ठेवलेल्या महिलेने मुका घेतानाचे फोटो नको तिथे टाकले! कोर्टाने महिलेला फटकारलं

Mumbai Crime news : विवाहित पुरुष आणि महिला दक्षिण मुंबईत एका जीममध्ये भेटले होते. त्यानंतर दोघांमध्ये जवळीक वाढली आणि त्याचं रुपांतर पुढे प्रेमात झालं.

विवाहित पुरुषासोबत प्रेमसंबंध ठेवलेल्या महिलेने मुका घेतानाचे फोटो नको तिथे टाकले! कोर्टाने महिलेला फटकारलं
पीएफआय प्रकरणातील संशयित आरोपींच्या कोठडीत वाढImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 07, 2022 | 9:06 AM

मुंबई : विवाहित पुरुषासोबत प्रेमसंबंध ठेवलेल्या एका महिलेला कोर्टानं (Mumbai Court News) फटकारलं आहे. या महिलेचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळून लावला. 42 वर्षीय महिलेवर माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली (Information Technology Act) गुन्हा दाखल करण्यात आला असून तिच्या विवाहित प्रियकराने तिच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. मुंबईच्या प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या मलबार हिलमधून (Malabar Hill Mumbai) धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्याच्यासोबत आपण प्रेम संबंध ठेवले आहेत, तो विवाहित असून त्याला एक एक मुलगीदेखील आहे, याची कल्पना एक महिलेला होती. तरिही या महिलेनं त्याच्यासोबत प्रेमसंबंध ठेवले. दरम्यान, यानंतर या महिलेनं लग्नासाठी या पुरुषाकडे तगादा लावला. नंतर ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. इतकंच काय तर या पुरुषासोबत मुका घेतानाचे फोटो चक्क त्याच्या मुलीच्या शाळेच्या वेबसाईटवर अपलोडही केले. अखेर न राहवून या महिलेविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर या महिलेनं अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. त्यावर कोर्टात सुनावणी झाली असता, कोर्टानं या आरोपी महिलेला फटकारलंय.

कोर्टाने काय म्हटलं?

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार मुंबई सत्र न्यायालयानं महिलेचा जामीन अर्ज नाकारताना म्हटलंय, की…

अख्खं आयुष्य महिला आणि तिचा विवाहित प्रियकर भांडू शकतात. पण त्यांनी केलेल्या चुकांची शिक्षा त्यांच्या मुलांना भोगायला लावणं, गुन्हा आहे. विवाहित पुरुषाच्या मुलीला आणि कुटुंबीयांना यामध्ये ओढलं अयोग्य आहे. त्यांच्या भविष्यासोबत, करिअरसोबत आणि व्यक्तिगत सामाजिक आयुष्यासोबत छेडछाड करणं अत्यंत निंदनीय आहे.

हे सुद्धा वाचा

काय आहे प्रकरण?

विवाहित पुरुष आणि महिला दक्षिण मुंबईत एका जीममध्ये भेटले होते. त्यानंतर दोघांमध्ये जवळीक वाढली आणि त्याचं रुपांतर पुढे प्रेमात झालं. महिलेला विवाहित पुरुषाने महागड्या भेटवस्तू दिल्या. डायमंडची रिंग दिली. यावेळी महिलेला पुरुष विवाहित असल्याचं आणि त्याला एक मुलगी असल्याचंही माहिती होतं. दरम्यानच्या काळात विवाहित पुरुष आणि महिलेत वाद सुरु झाले. महिलेनं लग्नासाठी विवाहित पुरुषाकडे तगादा लावला. त्याने घटस्फोट घ्यावा आणि माझ्याशी लग्न करावं, अशी मागणी केली. मात्र यावरुन खटके उडू लागले. वाद वाढले. अखेर महिलेनं टोकाचं पाऊल उचललं.

विवाहित पुरुष एकदा त्याचा आयपॅड जीममध्येच विसरुन गेला होता. त्यावेळी मुका घेतानाचा फोटो आयपॅडच्या व्हॉलपेपर ठेवला होता. यानंतर जीम ट्रेनरने हे फोटो इतरांना दाखवले होते. इतकंच नाही, तर नंतर अशाप्रकारचे अश्लिल फोटो सोशल मीडियातूनही महिलेनं व्हायरल केले होते.

वैतागून अखेर विवाहीत पुरुषानं त्याचा फोन नंबर तीन वेळा बदलला. पण तरिही महिला त्याची पाठ काही सोडायला तयार नव्हती. अखेर या महिलेनं चक्क प्रियकर विवाहित पुरषासोबत मुका घेतानाचा फोटो त्याच्या मुलीच्याच शाळेच्या वेबसाईटवर अपलोड केला. या प्रकारानं प्रचंड संतापलेल्या पुरुषाने अखेर मलबार हिल पोलिसांत तक्रार दाखल केली.

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.