Mumbai : मुंबई हादरली! गँगरेपदरम्यान प्रायव्हेट पार्टवर दिले सिगारेटचे चटके
मुंबईच्या कुर्ला भागात घरात घुसून नरधमांचं संपातजनक कृत्य! व्हिडीओ रेकॉर्ड करुन दिली धमकी
मुंबई : 42 वर्षीय महिलेवर कुर्ला परिसरात सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तिघा नराधमांनी मिळून पीडितेच्या घरात घुसून तिच्यावर हल्ला केला. इतकंच नाही तर सामूहिक बलात्कार करुन पीडितेच्या प्रायव्हेट पार्टवर सिगारेटचे चटके देण्याचा घृणास्पद प्रकारही केल्याचं समोर आलंय. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला असून आरोपींचा शोध सुरु आहे. रविवारी उघडकीस आलेल्या या घटनेनं मुंबई हादरलीय. मुंबईच्या पूर्व उपनगरातील कुर्ला येथील परिसरात सामूहिक बलात्काराच्या घटनेनं खळबळ माजलीय.
आधी हल्ला, मग बलात्कार
एका संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, 42 वर्षीय महिलेच्या घरात घुसून तिघा जणांनी संतापजनक कृत्य केलं. या महिलेवर आधी धारदार शस्त्रांनी सपासप वार करण्यात आले. त्यानंतर या महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. या बलात्कारादरम्यान, नराधमांनी क्रूरपणे महिलेच्या गुप्तांगाला सिगारेटचे चटके दिले. या महिला गंभीररीत्या जखमी झाली.
कुर्ला येथे ही घटना घडली. याप्रकरणातील तिन्ही नराधम आरोपी हे देखील कुर्ल्यातीलच राहणारे असल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नराधमांनी आळीपाळीनं या महिलेसोबत अनैसर्गिकरीत्य लैंगिक संबंध ठेवले. तिच्या दोन्ही हातांवर धारदार शस्त्राने वार केले.
इतकंच नव्हे, तर या घटनेचा व्हिडीओदेखील रेकॉर्ड करुन महिलेला धमकावलं. तुझा हा व्हिडीओ व्हायरल करुन, अशी धमकी या महिलेला नराधमांनी दिल्याचंही पोलिसांनी सांगितलं.
गुन्हा दाखल!
पीडितेनं आपल्या शेजारी राहणाऱ्यांना आपल्यासोबत घडलेला प्रसंग सांगितल्याचं पोलिसांनी म्हटलंय. त्यानंतर एका सामाजिक संस्थेशी संपर्क केल्यानं या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. तिघा आरोपींविरोधात कलम 376, 376 ड, 377, 324 आणि अन्य काही कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या तिन्ही आरोपी फरार असून त्यांचा शोध घेतला जातो आहे. या आरोपींना आता नेमकी अटक केव्हा केली जाते, हे पाहणं महत्त्वाचंय. एका महिलेसोबत घरात घुसून घडलेल्या या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे. तसंच महिलांच्या सुरक्षेचा मुद्दाही ऐरणीवर आलाय.