कोण आहेत समीर वानखेडे ज्यांच्या रेडमध्ये शाहरुखच्या मुलासह बडे बडे सापडलेत?

महाराष्ट्रात राहणारे समीर वानखेडे हे 2004 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. भारतीय पोलिस सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर डेप्युटी कस्टम कमिश्नर म्हणून झाली होती

कोण आहेत समीर वानखेडे ज्यांच्या रेडमध्ये शाहरुखच्या मुलासह बडे बडे सापडलेत?
Sameer Wankhede
Follow us
| Updated on: Oct 12, 2021 | 7:41 AM

मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान (Shahrukh Khan) याच्या मुलाला अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (NCB) ताब्यात घेतलं आहे. मुंबई-गोवा क्रूझवरील रेव्ह पार्टी प्रकरणी आर्यन खानची (Aryan Khan) एनसीबी अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात येत आहे. आर्यन खानसह आठ जणांना एनसीबीने ताब्यात घेतले असून यामध्ये अरबाझ मर्चंट, मूनमून धमेचा, नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकेर आणि गोमित चोप्रा यांचा समावेश आहे. अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि त्यांच्या पथकाने अगोदरच बुकिंग करुन क्रूझमध्ये प्रवेश मिळवला. पार्टीला सुरुवात झाल्यानंतर एनसीबीने मुंबई पोलिसांना माहिती देत अतिरिक्त कुमक मागवून घेतली. क्रूझ मुंबईच्या किनाऱ्यावर पोहोचले तेव्हा मुंबई पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

कोण आहेत समीर वानखेडे?

महाराष्ट्रात राहणारे समीर वानखेडे हे 2008 च्या बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय पोलिस सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर डेप्युटी कस्टम कमिश्नर म्हणून झाली होती. त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले.

समीर वानखेडे हे ड्रग्जशी संबंधित प्रकरणांचा छडा लावण्यात तज्ज्ञ मानले जातात. समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटींच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे.

कोणकोणत्या पदांवर काम

2008 ते 2021 पर्यंत त्यांनी एअर इंटेलिजन्स युनिट (एआययू) चे उपायुक्त, राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) अतिरिक्त एसपी, महसूल गुप्तचर संचालनालयाचे (डीआरआय) संयुक्त आयुक्त आणि आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) विभागीय संचालक अशा विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.

वर्ल्डकप ट्रॉफीही अडवली

2013 मध्ये वानखेडेंनी गायक मिका सिंगला परदेशी चलनासह मुंबई विमानतळावर पकडले होते. अनुराग कश्यप, विवेक ओबेरॉय आणि राम गोपाल वर्मा यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींच्या मालमत्तांवर त्यांनी छापे टाकले आहेत. 2011 मध्ये, सोन्याने बनवलेल्या क्रिकेट विश्वचषक ट्रॉफीला देखील कस्टम ड्यूटी भरल्यानंतरच मुंबई विमानतळावरून बाहेर पडण्याची परवानगी दिली होती.

एनसीबीच्या चौकशीत आयपीएस समीर वानखेडे यांच्या एन्ट्रीमुळे बॉलिवूडमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे म्हटले जाते. बॉलिवूडमधील जे कलाकार ड्रग्ज घेतात किंवा मादक पदार्थांची खरेदी-विक्री करतात ते या क्षणी घाबरल्याची चर्चा आहे, याचे कारण समीर वानखेडे. डीआरआयमध्ये तैनात समीर वानखेडे यांना गेल्या वर्षी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये पाठवण्यात आले आहे. आता समीर मुंबईत उपस्थित असलेल्या एनसीबी टीमचा एक भाग आहेत, जी सुशांत प्रकरणात ड्रग्ज अँगलचा तपास करत आहे.

अभिनेत्री क्रांती रेडकरचे पती

इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे समीर वानखेडे एका मराठी अभिनेत्रीचे पती आहेत. सुप्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकर हिच्याशी समीर वानखेडे यांनी 2017 मध्ये लगीनगाठ बांधली. त्यांना जुळी मुलंही आहेत. क्रांती रेडकर ‘कोंबडी पळाली’ गाण्यासह जत्रा, माझा नवरा तुझी बायको, फुल थ्री धमाल अशा अनेक सिनेमात झळकली आहे.

क्रूझ मुंबईच्या दिशेने वळवली

पार्टीला सुरुवात झाल्यानंतर एनसीबीने मुंबई पोलिसांना माहिती देत अतिरिक्त कुमक मागवून घेतली. गोव्याला जाणारी क्रूझ बोट पुन्हा मुंबईच्या दिशेने वळवण्यात आली. क्रूझमध्ये बिघाड झाल्याचं प्रवाशांना सांगण्यात आलं. क्रूझ मुंबईच्या किनाऱ्यावर पोहोचले तेव्हा त्या ठिकाणी मुंबई पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यानंतर एनसीबीने रेव्ह पार्टीत सहभागी असलेल्या लोकांना ताब्यात घेतले. या सर्वांची बॅलार्ड पिअर येथील कार्यालयात रात्रभर चौकशी करण्यात आली. या सगळ्यांचे जबाब नोंदवल्यानंतर लवकरच अटकेची कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कपड्यांमधून ड्रग्ज आणले

पार्टीमध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींनी पँटच्या शिलाईत, महिलांच्या पर्समधील हँडलमध्ये, अंडरवेअरच्या शिलाईत तसंच कॉलरच्या शिलाईतून अंमली पदार्थ आणले होते. अंमली पदार्थ तस्करांच्या मुसक्या आवळल्यानंतर त्यांनीच या पार्टीबद्दल माहिती दिली होती. या माहितीच्या आधारे एनसीबीने छापा टाकून एकूण 22 जणांना ताब्यात घेतलं. कोडवर्ड वापरुन ही पार्टी आयोजित करण्यात आली होती. RTPCR असा हा कोड असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

संबंधित बातम्या :

 शाहरुख खानचा मुलगा एनसीबीच्या ताब्यात, क्रूझवरील रेव्ह पार्टी प्रकरणी आर्यनवर कारवाई

RTPCR कोडवर्ड वापरुन क्रूझवर प्रवेश, पार्टी सुरु होताच छापा, समीर वानखेडेंची पुन्हा डॅशिंग कामगिरी

‘कभी खुशी कभी गम’मधून डेब्यू ते ताईक्वांदोत सुवर्ण, NCB च्या ताब्यात असलेल्या आर्यन शाहरुख खानविषयी सर्वकाही

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.