Video : लेडिज डब्ब्यात चक्क WWE! व्हिडीओ व्हायरल, केस ओढले, कान सुजवले, आणि…
ठाणे-पनवेल लोकलमध्ये लेडिज डब्ब्यात बुधवारी रात्री झालेली हाणामारी आता व्हायरल झालीय.
मुंबई : मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकलमध्ये (Mumbai Local) गर्दीच्या वेळी बसायला सीट मिळावी, यासाठी चढाओढ असते. गर्दीच्या वेळी लोकलच्या डब्यातली होणारी भांडणं मुंबईकरांसाठी नवी नक्कीच नाहीत. पण लेडिज डब्ब्यात नुकतीच झालेली फ्री स्टाईल हाणामारी चर्चेचा विषय ठरतेय. सोशल मीडियात (Social Media) लेडिज डब्ब्यात झालेल्या हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल (Mumbai Local Women Fight) झालाय. या व्हिडीओमध्ये महिलांमध्ये WWE सारखी जबर मारहाण धावत्या लोकलमध्येच झाली. याच डब्ब्यात असणाऱ्या काही महिलांनी या घटनेचा व्हिडीओ आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलाय.
लेडिज डब्ब्यात सीटवरुन भांडण झालं. दोन महिला तावातावाने एका तरुणीला जाब विचारत मारहाण करु लागल्याचं दिसून आलंय. केस ओढत, पाठीत बुक्के घालत, या महिलेवर इतर प्रवासी महिला तुटून पडल्या होत्या.
Vashi, Navi Mumbai | Few women started hitting each other following dispute over seat, a female staff was injured: S Katare, Senior Police Inspector, Vashi Railway Station, on scuffle b/w 3 women in a local train running from Thane to Panvel, today
(Pic 1:Screengrab;viral video) pic.twitter.com/A6bPR3phhA
— ANI (@ANI) October 6, 2022
सोबत असलेल्या इतर महिला प्रवाशांनी तरुणीला होत असलेली मारहाण थांबवण्यासाठी दमदाटीही केली. पण संतापाच्या भरात मारहाण करण्यात आलेल्या तरुणीनंही स्वसंरक्षणासाठी हल्ला चढवल्याचं व्हिडीओत दिसून आलंय.
ही घटना मुंबईच्या ट्रान्सहार्बर रेल्वे मार्गावर घडली. ठाणे-पनवेल लोकलदरम्यान, ही हाणामारी झाली. वाशी रेल्वे पोलिसांनी या घटनेबाबत महत्त्वाची माहिती दिली.
एक महिला पोलीसही मारहाणीच्या घटनेत गंभीररीत्या जखमी झाली. या महिला पोलिसाच्या कपाळाला मार लागून रक्तस्रावही होत होता. महिला पोलिसासह एकूण दोघी जणी या घटनेत जखमी झाल्यात.
पाहा फ्री स्टाईल हाणामारी
WWE IN MUMBAI LOCAL…pic.twitter.com/bQibZIRrsD
— Aditya Bidwai (@AdityaBidwai) October 6, 2022
नेमका वाद कशामुळे?
बुधवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. एक महिला आपल्या नातीसह ठाण्याहून ट्रेनमध्ये बसली होती. तर दुसरी एक महिला कोपरखैरणे इथं ट्रेनमध्ये चढली. ही महिला सीट रिकामी होण्याची वाट पाहत होती.
तुर्भे येथे सीट रिकामी झाल्यानंतर आजीने आपल्या नातीला तिथं बसवण्यासाठी हालचाल केली. त्याच वेळी महिलाही तिथं बसण्याच्या प्रयत्नात होती. यावेळी झालेल्या झटापटीवरुन लेडिज डब्यात तुफान राडा झाला.
हे भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या एका महिला पोलिस कर्मचारीवर हल्ला करण्यात आला. यात महिला पोलिसांच्या डोक्याला जखम झाली. या घटनेचा व्हिडीओ लोकल प्रवाशांमध्ये व्हायरल झालाय. सीटवरुन सुरु असलेल्या लोकलमधील संघर्ष पुन्हा एकदा या घटनेनं अधोरेखित केलाय.