Mumbai Crime : अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, लाखोंचे ड्रग्ज जप्त

अंमली पदार्थ तस्करी रोखणे पोलिसांसमोर आव्हान ठरले आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश केला आहे.

Mumbai Crime : अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, लाखोंचे ड्रग्ज जप्त
मुंबईत ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करत 9 आरोपींना अटकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 18, 2023 | 9:33 AM

मुंबई / 18 ऑगस्ट 2023 : मुंबई गुन्हे शाखेने अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तब्बल 71 लाख रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करत 9 जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींमध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे. गुन्हे शाखा कक्ष 6 ने ही कारवाई केली. या कारवाईत 350 ग्रॅम मेफेड्रेन आणि 45 ग्रॅम जप्त चरस करण्यात आले. यासोबतच आरोपींकडून 17.89 लाख रुपयांची रोकडही हस्तगत करण्यात आली आहे. अटक आरोपींमध्ये तीन अभिलेखावरील आरोपींचा समावेश आहे.

गुप्त माहितीच्या आधारे कारवाई

काही दिवसांपूर्वी गुन्हे शाखा कक्ष सहाला खबर मिळाली होती की, काही लोक ड्रग्सचा मोठा साठा घेऊन मुंबईत प्रवेश करणार आहेत. त्या अनुषंगाने मुलुंडजवळ सापळा लावण्यात आला आणि संशयतांची गाडी दिसताच पोलिसांनी त्यांना अटकाव केला. यावेळी गाडीतून तसेच आरोपींच्या घरातून 350 ग्रॅम मेफेड्रोन आणि 45 ग्रॅम चरस जप्त करण्यात आले. नऊपैकी तीन आरोपी हे अभिलेखावरील गुन्हेगार असून काहींवर अंमली पदार्थ संबंधित गुन्हे देखील दाखल आहेत.

या संपूर्ण प्रकरणात आरोपी मध्ये एक महिला देखील अटक करण्यात आलेली आहे. त्या महिलेचे नाव सना साबीर अली खान उर्फ प्रियांका अशोक कारकवर आहे. या महिलेकडे दोन आधार कार्ड आणि इतर कागदपत्रे मिळालेले आहेत. मात्र पोलीस या महिलेसंदर्भात अधिक तपास करत आहेत. आरोपी मुंबईमध्ये भाड्याने घर घेऊन राहत होते, प्रामुख्याने ड्रग्स सप्लाय करणे किंवा पोहचवणे त्यांचं काम होतं. मात्र या संपूर्ण रॅकेटमध्ये आणखीन कोण आहे किंवा त्यांच्या मास्टरमाइंड कोण आहे या संदर्भात तपास पोलीस करत आहे.

हे सुद्धा वाचा

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.