Mumbai Crime : मुंबई दहशतवाद्यांच्या हॉटस्पॉटवर, मंत्रालय नियंत्रण कक्षाला धमकीचा ‘तो’ फोन

रेल्वेत बॉम्ब ठेवल्याच्या फोननंतर आता मंत्रालय नियंत्रण कक्षाला दहशतवादी कारवाया करणार असल्याचा धमकीचा फोन आल्याने एकच खळबळ माजली आहे.

Mumbai Crime : मुंबई दहशतवाद्यांच्या हॉटस्पॉटवर, मंत्रालय नियंत्रण कक्षाला धमकीचा 'तो' फोन
मंत्रालय नियंत्रण कक्षाला धमकीचा फोनImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Aug 08, 2023 | 9:46 AM

मुंबई / 8 ऑगस्ट 2023 : मंत्रालय नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आल्याची धक्कदायक घटना घडली आहे. फोन करणाऱ्याने एक-दोन दिवसात अतिरेकी कारवाई करण्याची धमकी दिली. मंत्रालय नियंत्रण कक्षातील लँड लाईनवर काल रात्री 10 वाजता हा फोन आला होता. या फोनमुळे एकच खळबळ माजली असून, मुंबई पोलीस सतर्क झाले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला कांदिवली येथून अटक केली आहे. आरोपीला दुपारी कोर्टात हजर करण्यात येणार आहे. आोरपीने हा फोन का केला? कोणत्या उद्देशाने केला? खरंच काही अतिरेकी कारवाईचा कट आहे की केवळ दहशत माजवण्याच्या उद्देशाने हा फोन करण्यात आला? याबाबत मुंबई पोलीस आरोपीची चौकशी करत आहेत.

मात्र वारंवार येणाऱ्या अशा धमकीच्या फोनमुळे मुंबई पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या रडारवर आहे का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याप्रकरणी मुंबई पोलीस वेगाने तपासचक्रे फिरवत आहेत. स्वातंत्र दिन जवळ येत आहे. या पार्श्वभूमीवर या धमकीच्या फोनमुळे पोलीस सतर्क झाले आहेत. पोलीस सदर कॉल ट्रेस करत आहेत. लवकरच आरोपीला अटक होण्याची शक्यता आहे.

याआधीही रेल्वेत बॉम्ब असल्याचा फोन आला

याआधी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला रेल्वेत बॉम्ब असल्याचा निनावी फोन आला होता. यानंतर पोलीस दलात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी सदर कॉल ट्रेस करत एका आरोपीला जुहूमधून अटक केली. अशोक मुखिया असं अटक आरोपीचं नाव आहे. आरोपीने मुंबईत ट्रेनमध्ये सीरियल बॉम्बस्फोट होणार असल्याची फोनवर माहिती दिली होती.

हे सुद्धा वाचा

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.