Mumbai Crime : व्यावसायिकाचे अपहरण प्रकरण, राज सुर्वे फरार, तिन्ही आरोपींना पोलीस कोठडी

गोरेगावमधील व्यावसायिकाच्या अपहरण प्रकरणातील तिन्ही आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र या प्रकरणानंतर आमदार प्रराश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे फरार आहे.

Mumbai Crime : व्यावसायिकाचे अपहरण प्रकरण, राज सुर्वे फरार, तिन्ही आरोपींना पोलीस कोठडी
व्यावसायिक आत्महत्या प्रकरणी आरोपींना पोलीस कोठडीImage Credit source: प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Aug 11, 2023 | 5:59 PM

मुंबई / 11 ऑगस्ट 2023 : गोरेगाव येथील व्यावसायिकाच्या अपहरण प्रकरणी अटक झालेल्या तिन्ही आरोपींना न्यायालयाने 14 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर या प्रकरणातील आणखी एक आरोपी आमदार प्रकाश सुर्वे यांचा पुत्र राज सुर्वे मात्र फरार आहे. मुंबई पोलिसांकडूनही याबाबत अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही. तसेच आमदार सुर्वे यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. व्यावसायिकाचे अपहरण करुन धमकी देणे राज सुर्वे यांनाही चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणातील तीन आरोपींना काल मुंबई विमानतळावरुन अटक करण्यात आली. यानंतर आरोपींना आज बोरिवली कोर्टात हजर करण्यात आले. पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

व्यावसायिकाचे अपहरण करुन धमकी

बुधवारी दुपारी आदिशक्ती फिल्म्सचे सीईओ राजकुमार सिंग यांचे काही लोकांनी त्यांच्या कार्यालयात घुसून अपहरण केले. त्यानंतर त्यांना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या कार्यालयात आणण्यात आले. तेथून त्यांना एका फ्लॅटमध्ये नेत बंदुकीचा धाक दाखवून कर्जाचा करार संपल्याचे लिहून घेण्यात आले. तसेच याबाबत कुठेही वाच्छता केल्यास खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देण्यात आली होती.

तीन आरोपींना पोलीस कोठडी

यानंतर सिंग यांचे नातेवाईक पोलिसांसह प्रकाश सुर्वे यांच्या कार्यालयात पोहचले होते. तेथून सिंग यांची सुटका करत पोलीस ठाण्यात आणण्यात आले. या प्रकारामुळे सिंग यांना मानसिक धक्का बसला होता. मात्र कुटुंबीयांनी मानसिक धीर दिल्यानंतर सिंग यांनी वनराई पोलिसात राज सुर्वे यांच्यासह अन्य आरोपींविरोधात फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी राज सुर्वेसह अन्य आरोपींविरोधात अपहरण आणि धमकी प्रकरणी गुन्हा दाखल केला. आरोपींपैकी मनोज मिश्रा, विपुल सिंग, चेतन सिंग यांना काल विमानतळावरून अटक करून आज बोरिवली न्यायालयात हजर केले असता त्यांना 14 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.