Mumbai Crime : चित्रपट पाहून रात्री उशिरा घरी परतले, मग पती-पत्नीत जोरदार वाद झाला अन् सर्व संपले !

वैवाहिक वादातून सात वर्षापूर्वी एका डॉक्टरने आपल्या पत्नीला अतिशय निर्घृणपणे संपवले होते. सात वर्षे चाललेल्या या खटल्याबाबत न्यायालयाने निकाल दिला आहे.

Mumbai Crime : चित्रपट पाहून रात्री उशिरा घरी परतले, मग पती-पत्नीत जोरदार वाद झाला अन् सर्व संपले !
पत्नीची हत्या करणाऱ्या डॉक्टरला जन्मठेपImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 25, 2023 | 11:27 AM

मुंबई / 25 जुलै 2023 : वैवाहिक वादातून पत्नीची हत्या करणाऱ्या डॉक्टरला मुंबई सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. डॉ. उमेश बाबोळे असे आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या 4 वर्षाच्या मुलाची साक्ष महत्वपूर्ण पुरावा मानत न्यायालयाने शिक्षा सुनावली. उमेश बाबोळे हा दंतचिकित्सक असून, त्याने डिसेंबर 2016 मध्ये चाकूने 38 वार करत पत्नीची हत्या केली होती. सात वर्षे हा खटला न्यायालयात चालला. अखेर सोमवारी न्यायालयाने यावर शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. पी. बनकर यांनी आरोपीला तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.

काय घडले ‘त्या’ रात्री?

डॉ. उमेश बाबोळे आणि त्याची पत्नी तनुजा दोघेही विभक्त राहत होते. घटनेच्या दिवशी उमेश पत्नीला तिच्या घरी भेटायला गेला होता. त्यानंतर पत्नी आणि मुलाला घेऊन सिनेमा पहायला गेले. तेथून रात्री उशिरा घरी परतले. घरी आल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेला आणि उमेशने किचनमधून चाकू आणला आणि पत्नीवर वार करुन तिची हत्या केली. हा सर्व प्रकार उमेशच्या 4 वर्षाच्या मुलासमोर घडला.

यानंतर आरोपीने स्वतः पोलील कंट्रोल रुमला फोन करुन हत्येची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहिले असता तनुजा रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. घटनास्थळाचा पंचनामा करत मोबाईल, चाकू आणि इतर पुरावे ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपी पतीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. यानंतर मुंबई सत्र न्यायालयात या हत्या प्रकरणी खटला चालू होता.

हे सुद्धा वाचा

चार वर्षाच्या मुलाची साक्ष ठरली महत्वपूर्ण

खटल्यादरम्यान आरोपीच्या वकिलाने सर्व आरोप खोडून टाकण्याचा प्रयत्न केला. आरोपीने मानसिक तणावातून हे कृत्य केल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी एका मानसोपचार तज्ज्ञालाही न्यायालयात हजर करत मानसिक केसचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीच्या 4 वर्षाच्या मुलाची साक्ष महत्वपूर्ण मानत खटला दाखल करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची साक्षही सबळ पुरावा मानत हा निर्णय सुनावला. सरकारी पक्षाने 10 साक्षीदार तपासत हा सुनियोजीत हत्या असल्याचे ठामपणे सांगितले. तनुजा हिने त्याआधी उमेशविरोधात घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला होता.

'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.