Mumbai Crime : बेडरुममधील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत पैशांची मागणी, व्यावसायिकाकडे 10 लाख मागितले !

घरातील खाजगी सीसीटीव्ही फुटेजमधून व्हिडिओ बनवून व्यावसायिकाला ब्लॅकमेल केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

Mumbai Crime : बेडरुममधील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत पैशांची मागणी, व्यावसायिकाकडे 10 लाख मागितले !
व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देण्याची पैशांची मागणीImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Jul 28, 2023 | 1:32 PM

मुंबई / 28 जुलै 2023 : अंधेरीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बेडरुममधील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत एका व्यावसायिकाकडे 10 लाखाची मागणी केली. याप्रकरणी आंबोली पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. शबिन शाह आणि सुमित गुप्ता अशी अटक आरोपींची नावे आहेत. भारतीय दंड संहितेच्या कलम 379 (चोरी) आणि 384 (खंडणी), 43B आणि 66E अंतर्गत आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी आणखी किती जणांना अशा प्रकारे व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केले आहे, किती पैसे लुटले आहेत याबाबत पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी लावले होते सीसीटीव्ही

अंधेरी पश्चिम येथील रहिवासी असलेल्या व्यावसायिकाचा इंटरनेट सेवा पुरवण्याचा व्यवसाय आहे. तसेच पीडित एका राजकीय पक्षाचा पदाधिकारीही आहे. व्यावसायिकाने आपल्या घरी मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही लावले होते. याच सीसीटीव्हीतील व्यावसायिकाचा बेडरुमधील त्या क्षणांचा व्हिडिओ बनवण्यात आला. त्यानंतर आरोपींनी व्यावसायिकाला तो व्हिडिओ पाठवून व्हायरल करण्याची धमकी देत 10 लाख रुपये मागितले.

आरोपींकडून गुन्ह्याची कबुली

व्यावसायिकाने तात्काळ आंबोली पोलिसात धाव घेत पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ तपास हाती घेत दोन संशयितांना ताब्यात घेतले. आरोपींची चौकशी केली असता त्यांनी गुन्हा कबूल केला आहे. आरोपींनी खाजगी सीसीटीव्ही फुटेज कसे मिळवले याबाबत पोलीस आरोपींची चौकशी करत आहेत. या गुन्ह्यात आणखी कुणाचा सहभाग आहे का याबाबतही पोलीस तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.