Mumbai Crime : कॉमन मित्राद्वारे ओळख झाली, ओळखीचे प्रेमात रुपांतर, मग प्रेयसीलाच गंडा

लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार करण्याच्या घटना हल्ली वाढत आहेत. अशीच एक घटना मुंबईतील अंधेरी परिसरात उघडकीस आली आहे.

Mumbai Crime : कॉमन मित्राद्वारे ओळख झाली, ओळखीचे प्रेमात रुपांतर, मग प्रेयसीलाच गंडा
प्रेमाच्या जाळ्यात ओढत महिलेला लाखोंचा गंडा
Follow us
| Updated on: Aug 22, 2023 | 4:30 PM

मुंबई / 22 ऑगस्ट 2023 : प्रेमाच्या जाळ्यात ओढत महिला व्यावसायिकाचा लैंगिक छळ आणि फसवणूक केल्याची धक्कादायक घटना अंधेरी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सिद्धार्थ दिलीप मेहता असे अटक आरोपीचे नाव आहे. आरोपीवर जुहू, खार पोलीस ठाणे आणि आर्थिक गुन्हे शाखेत फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. आरोपीने महिलेची शेअर मार्केटमध्ये चांगला परतावा मिळवून देण्याच्या नावाखाली महिलेला 70 लाख रुपयांचा गंडा घातला. पोलीस आरोपीची अधिक चौकशी करत आहेत.

कॉमन फ्रेंडद्वारे झाली ओळख

पीडित महिला आणि आरोपीची डिसेंबर 2022 मध्ये एका कॉमन फ्रेंडद्वारे ओळख झाली होती. आरोपीने आपण शेअर ब्रोकर असून वर्सोवा येथे राहत असल्याचे सांगितले होते. काही दिवसांनी आरोपी आणि पीडितेमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. मेहता याने प्रेमसंबंधाचा फायदा घेत पीडितेवर अनेकदा लैंगिक अत्याचार केले. तसेच शेअर मार्केटमध्ये दुप्पट परतावा मिळवून देण्याच्या बहाण्याने गुंतवणूक करण्यास भाग पाडले. पीडितेने 70 लाख रुपये आरोपीच्या सांगण्यावरुन गुंतवले.

सुरवातीला मेहताने समाधानकारक परतावा दिला, मात्र नंतर परतावा देणे बंद केले. काही दिवसांनी महिलेने आरोपीकडे लग्नाबाबत विचारले असता त्याने टाळाटाळ करण्यास सुरवात केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने ओशिवरा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. यानंतर सखोल चौकशीनंतर मेहता यांच्यावर लैंगिक छळ, फसवणूक, गैरवर्तन आणि धमकावणे असे गुन्हे दाखल करण्यात आले. आरोपी त्यानंतर फरार झाला होता.

हे सुद्धा वाचा

मात्र वांद्रे युनिट 9 च्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी गिरगाव येथून पकडले आणि त्यानंतर पुढील चौकशीसाठी त्याला ओशिवरा पोलिसांच्या ताब्यात दिले. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.