Mumbai Crime : बँक ऑफ इंडियातून पुन्हा दागिने गायब, महिला ग्राहकाचे लाखोंचे दागिने गेले कुठे?

बँक ऑफ इंडियामध्ये सध्या धक्कादायक प्रकार उघडकीस येत आहेत. बँकेच्या लॉकरमधून ग्राहकांचे दागिने चोरीला जात असल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Mumbai Crime : बँक ऑफ इंडियातून पुन्हा दागिने गायब, महिला ग्राहकाचे लाखोंचे दागिने गेले कुठे?
बँक ऑफ इंडियाच्या लॉकरमधून महिलेचे दागिने लंपास
Follow us
| Updated on: Aug 21, 2023 | 11:52 AM

मुंबई / 21 ऑगस्ट 2023 : महिनाभरापूर्वीची दागिने चोरीची घटना ताजी असतानाच आता बँक ऑफ इंडियाच्या लॉकरमधून पुन्हा दागिने चोरीला गेले आहेत. अंधेरी येथील रहिवासी असलेल्या महिलेचे 12 लाखांचे दागिने बँकेच्या लॉकरमधून गायब झाले आहेत. याप्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. महिनाभरापूर्वी बँक ऑफ इंडियाच्या वाळकेश्वर शाखेतील दोन लॉकरमधून सोने चोरी गेले होते. याप्रकरणी लॉकरचा रखवालदार असलेल्या बँक कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली होती. मात्र बँक ऑफ इंडियात सतत उघडकीस येणाऱ्या या घटनांमुळे ग्राहकांच्या वस्तूच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

काय आहे प्रकरण?

अंधेरी येथील रहिवासी असलेल्या मिला संपत या महिलेचे महालक्ष्मीच्या भुलाभाई देसाई रोडवर असलेल्या बँक ऑफ इंडियाच्या शाखेत लॉकर आहे. या लॉकरमध्ये संपत यांनी सोन्याचे, हिऱ्याचे दागिने आणि मौल्यवान घड्याळे ठेवली होती. वर्षभरातून एकदा त्या लॉकर तपासत असत. त्याप्रमाणे जानेवारी 2020 मध्ये संपत यांनी शेवटचे लॉकरमध्ये दागिने पाहिले. त्यानंतर लॉकडाऊनमुळे, त्यांना 2021 मध्ये लॉकर पाहता आले नाही.

महिलेने जून 2022 मध्ये बँकेला भेट दिली. मात्र लॉकर रुममध्ये प्रवेश करताच रुममधील वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे त्यांना लॉकर न तपासताच परतावे लागले. यानंतर ऑगस्ट 2022 मध्ये, संपत यांना एक व्हॉट्सअॅप मॅसेज आला. यात त्यांना कळवण्यात आले की, बँक बदलत आहे आणि त्यांना त्यांचे बँक लॉकर त्वरीत रिकामे करायचे आहे. या मॅसेजनंतर त्यांनी लॉकर तपासण्यासाठी बँकेला भेट दिली, तेव्हाच सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने गायब असल्याचे आढळून आले.

हे सुद्धा वाचा

हरवलेल्या दागिन्यांबाब संपत यांनी बँक मॅनेजरला कळवले, मात्र त्यांनी लक्ष दिले नाही. बँकेच्या अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद मिळाला नाही. अखेर त्यांनी गावदेवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. संपत यांच्या तक्रारीनंतर, गावदेवी पोलिसांनी तपास सुरू केला आणि आयपीसीच्या कलम 380 अंतर्गत एफआयआर नोंदवला.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.