माणुसकीला काळिमा फासणारी घटना, मांजरीला जखमी केले म्हणून कुत्र्यावर अॅसिड हल्ला, महिलेला अटक

माणुसकीला काळिमा फासणारी मालाडमधील मालवणी परिसरात उघडकीस आली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.

माणुसकीला काळिमा फासणारी घटना, मांजरीला जखमी केले म्हणून कुत्र्यावर अॅसिड हल्ला, महिलेला अटक
मालाडमध्ये कुत्र्यावर अॅसिड फेकणाऱ्या महिलेला अटकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 18, 2023 | 12:11 PM

मुंबई / 18 ऑगस्ट 2023 : मालाडमध्ये पाळीव कुत्र्यावर अॅसिड फेकल्याप्रकरणी अखेर त्या महिलेला अटक करण्यात आली आहे. शाबिस्ता सुहेल अन्सारी असे आरोपी महिलेचे नाव आहे. मालवणी पोलिसांनी महिलेविरुद्ध कलम 429 भादंवि 11(1) (अ) प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायदा 1960 सह कलम 119 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. अॅसिड हल्ल्याचा हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. त्यावरुन पोलिसांनी महिलेवर कारवाई करत तिला अटक केली आहे.

मांजराला जखमी केले म्हणून कुत्र्यावर अॅसिड फेकले

मुंबईतील मालाड परिसरातील सामना नगर येथील मालवणी स्वप्नपूर्ती इमारतीत मानवतेला काळिमा फासणारी ही घटना घडली. सदर कुत्रा ब्राउनी मांजराशी खेळत होता. खेळताना त्याने रागाच्या भरात मांजरीला जखमी केले होते. यामुळे संतापलेल्या आरोपी महिलेने त्याच्यावर अॅसिड टाकले होते. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. कुत्र्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. हा सर्व प्रकार इमारतीतील सीसीटीव्हीत कैद झाला होता.

सीसीटीव्हीच्या आधारे महिलेला अटक

याप्रकरणी फिर्यादी बाळासाहेब तुकाराम भगत यांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 ऑगस्ट रोजी दुपारी 12.25 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बाळासाहेब भगत यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी महिलेला अटक केली असून, पुढील कारवाई करत आहेत. महिलेच्या या कृत्यामुळे रहिवाशांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.