Mumbai Crime : इन्स्टाग्रामवर पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाबाबत स्टेटस ठेवणे महागात पडले, दोघांना अटक आणि सुटका

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला धक्कादायक घटना मुंबईत उघडकीस आली आहे. एका सूज्ञ व्यावसायिकाच्या सतर्कतेमुळे पुढील मोठा अनर्थ टळला.

Mumbai Crime : इन्स्टाग्रामवर पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाबाबत स्टेटस ठेवणे महागात पडले, दोघांना अटक आणि सुटका
इन्स्टाग्रामवर वादग्रस्त स्टेटस टाकणाऱ्या दोघांना अटकImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 16, 2023 | 1:06 PM

मुंबई / 16 ऑगस्ट 2023 : इन्स्टाग्रामवर पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाबाबत स्टेटस ठेवणे दोघा किशोरवयीन मुलांना चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी कुलाबा पोलिसांनी दोघांना अटक केली. मात्र समज देऊन नंतर सोडून देण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, अटक प्रतिबंधात्मक स्वरूपाची होती आणि दोघांना चेतावणी दिल्यानंतर सोडण्यात आले. 14 ऑगस्ट रोजी पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन असतो. यानिमित्ताने पाकच्या स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवाचा स्टेटस या मुलांनी इन्स्टाग्रमावर ठेवला होता. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतले.

एका व्यावसायिकाच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलाब्यातील काही मुलांनी पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवाचा इन्स्टाग्रामवर स्टेटस ठेवला होता. याबाबत एका व्यावसायिकाने कुलाबा पोलिसांशी संपर्क साधून तक्रार दाखल केली. यामुळे जातीय तेढ निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी तात्काळ तरुणांचा शोध सुरु केला. कुलाबा पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) सोमवारी रात्री उशिरा या मुलांचा शोध घेतला. यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात आणले आणि सीआरपीसी 151(3) अंतर्गत प्रतिबंधात्मक अटक केली.

पोलिसांनी मुलांचे मोबाईल जप्त करुन तपासले असता, खरोखरच पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहाचा स्टेटस त्यांच्या इन्स्टाग्रामवर दिसला. पोलिसांनी त्यांच्या मोबाईलचा स्क्रीनशॉट काढून त्यांना ताब्यात घेतले. या दोघांची चौकशी केली असता त्यांच्या वागण्यावरून, बोलण्याच्या पद्धतीवरून ते 15 ऑगस्ट रोजी देशातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याच्या उद्देशाने हे करत होते, असे दिसून आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.