मुंबई : मातीपासून सोनं बनवणं, असं तुम्ही कधी ऐकलं आहे का? खरंतर पोलिसांसाठी देखील हे प्रकरण कदाचित नवीनच होतं. त्यामुळे सुरुवातीला पोलीसही चक्रावले. पोलिसांनी या प्रकरणात केलेल्या तपासात महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. या माहितीतून चोर पैसे कमविण्यासाठी काय शक्कल लढवितात या विचाराने तुम्ही आश्चर्यचकीत व्हाल. मुंबईच्या कांदिवली पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत मातीपासून सोने बनवण्याचा दावा करणाऱ्या टोळीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 जुलैला कांदिवली पोलीस ठाण्यात इको कारच्या सायलेन्सर चोरीची घटना घडली होती. जेव्हा पोलिसांनी एफआयआर नोंदवून या प्रकरणाचा तपास सुरु केला, तेव्हा एक धक्कादायक माहिती समोर आली. आरोपी फक्त इको कारचे सायलेन्सर चोरतात आणि प्रथम सायलेन्सरच्या आतून माती काढतात. नंतर प्लॅटिनम तयार करण्यासाठी ती माती वितळवतात. त्यानंतर त्या प्लॅटिनममधून सफेद सोने म्हणजेच व्हाईट गोल्ड तयार करतात. एक इकोच्या सायलेन्सरमधून जवळपास एक किलो माती बाहेर येते, ज्याची बाजारात किंमत 75 हजार आहे, पण हे लोक माती फक्त 25 ते 30 हजारात विकतात, अशी माहिती पोलिसांनी दिली.
याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. मुश्ताक गुल मोहम्मद शेख, सद्दाम हुसेन मोहम्मद शरीफ मनिहार आणि सुजित यादव अशी या आरोपींची नावे आहेत. हे सर्व कांदिवली आणि मालाड-मालवणीचे रहिवासी आहेत. ते गॅरेज लाईनशी जोडलेले आहेत, असं पोलिसांनी सांगितलं.
आतापर्यंत 9 सायलेन्सर चोरीच्या घटना समोर आल्या आहेत. त्यापैकी दोन गुन्हे कांदिवली पोलीस ठाण्यात दाखल आहेत. चोरांनी संपूर्ण मुंबईत 40 हून अधिक वाहनांचे सायलेन्सर चोरले आहेत. ही टोळी संपूर्ण भारतात सक्रिय आहे. आणि आणखी काही लोक यामध्ये सामील आहेत, ज्याची पोलीस चौकशी करत आहेत.
हेही वाचा :
स्वत:सोबत इतरांचाही जीव धोक्यात, अतिउत्साही तरुणांचा कारच्या बोनटवर बसून स्टंटबाजी
अनिल देशमुखांना सुप्रीम कोर्टाचा झटका, सर्व मागण्या फेटाळल्या, शेवटचा पर्यायही संपला?