पुण्यातील नामांकित बिल्डर परांजपे बंधू पोलिसांच्या ताब्यात, वृद्धेच्या तक्रारीनंतर गुन्हा

मुंबईतील विलेपार्ले पोलीस ठाण्यात बांधकाम व्यावसायिक परांजपे बंधूंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या विरोधात वसुंधरा डोंगरे नावाच्या 70 वर्षीय महिलेने तक्रार दिली होती

पुण्यातील नामांकित बिल्डर परांजपे बंधू पोलिसांच्या ताब्यात, वृद्धेच्या तक्रारीनंतर गुन्हा
Paranjape Builders
Follow us
| Updated on: Jun 25, 2021 | 7:36 AM

मुंबई/पुणे : पुण्यातील नामांकित बिल्डर परांजपे बंधूंना (Paranjape Builders) मुंबईच्या विलेपार्ले पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. फसवणुकीच्या आरोपाखाली श्रीकांत पुरुषोत्तम परांजपे आणि शशांक पुरुषोत्तम परांजपे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी दोघांना पुण्यातील त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतलं. (Mumbai Police Arrested Pune Builders Shrikant Paranjape Shashank Paranjape in cheating case)

70 वर्षीय महिलेची तक्रार

विलेपार्ले पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या विरोधात वसुंधरा डोंगरे नावाच्या 70 वर्षीय महिलेने तक्रार दिली होती. जागेबाबत कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याची माहिती आहे. बिल्डर बंधूंना मुंबई पोलिसांनी पुण्यातून मध्यरात्री विलेपार्ले पोलीस ठाण्यात आणलं.

फसवणूक केल्याबाबत गुन्हा

परांजपे बंधूंसह चार जणांवर विलेपार्ले पोलीस ठाण्यात कलम 476, 467, 68, 406, 420,120 ब अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. खोटी कागदपत्र बनवून विश्वासघात आणि फसवणूक केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. बिल्डर श्रीकांत पुरुषोत्तम परांजपे आणि शशांक परांजपे या दोघा बंधूंना ताब्यात घेऊन विलेपार्ले पोलीस पुढील तपास करत आहेत.

लंकड ग्रुपच्या मालकालाही अटक

नुकतंच पुण्यातील लंकड रिअ‍ॅलिटी बिल्डिंग कन्स्ट्रक्शन ग्रुपकडून (Pune Lunkad Realty Firms) ठेवीदारांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने लंकड रिअ‍ॅलिटी फर्म्सचा मालक अमित लंकडला (Amit Lunkad) अटक केली होती.

काय आहे घोटाळा

गुंतवलेल्या रकमेवर 15 टक्के परतावा देण्याचे आमिष गुंतवणूकदारांना दाखवण्यात आले होते. मात्र परतावा न दिल्याने गुंतवणूकदारांनी पुण्यातील येरवडा पोलिसात लंकडविरोधात तक्रार दाखल केली होती. पोलिसांच्या तपासानंतर गुंतवणूकदारांची थकित रक्कम तब्बल 25 कोटी रुपयांच्या घरात असल्याचं उघड झालं होतं.

संबंधित बातम्या :

गुंतवणूकदारांना गंडा, पुण्यातील लंकड रिअ‍ॅलिटी फर्म्सच्या मालकाला अटक

सैन्यात आणि रेल्वेत नोकरी देण्याच्या नावावर फसवणूक, दिल्लीत हवाईदलाच्या माजी अधिकाऱ्याला अटक

(Mumbai Police Arrested Pune Builders Shrikant Paranjape Shashank Paranjape in cheating case)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.