साकीनाका बलात्काराची नेमकी घटना काय, तपास कुठपर्यंत पोहोचला? मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडून सविस्तर माहिती

मुंबईच्या साकीनाका परिसरातील बलात्कार प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे. राज्यभरातून या घटनेवर रोष व्यक्त केला जातोय. या घटनेतील पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

साकीनाका बलात्काराची नेमकी घटना काय, तपास कुठपर्यंत पोहोचला? मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडून सविस्तर माहिती
हेमंत नगराळे, मुंबई पोलिस आयुक्त
Follow us
| Updated on: Sep 11, 2021 | 4:36 PM

मुंबई : मुंबईच्या साकीनाका परिसरातील बलात्कार प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे. राज्यभरातून या घटनेवर रोष व्यक्त केला जातोय. या घटनेतील पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. तसेच गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पत्रकार परिषद घेऊन संबंधित घटनेची सविस्तर माहिती सांगितली. यावेळी त्यांनी या प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आला याबाबतची माहिती देखील दिली.

नेमकं काय घडलं?

“गणेशोत्साव सारख्या महाराष्ट्राच्या महत्त्वाच्या धार्मिक सणामध्ये काल एक अत्यंत दुर्देवी आणि घृणास्पद घटना घडली आहे. अतिशय निंदणीय प्रकार घडला आहे. 9 आणि 10 सप्टेंबरच्या रात्री साधारण 3 वाजून 20 मिनिटांच्या दरम्यान साकीनाक्याच्या खैराणी रोड येथे पुठ्ठ्याची कंपनी आहे. त्या कंपनीचा वॉटमनने कंट्रोल रुमला फोन करुन कळवलं की, तिथे एका बाईला मारहाण सुरु आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कंट्रोल रुमने संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याला त्या ठिकाणी पाठवलं”, असं हेमंत नगराळे यांनी सांगितलं.

‘महिलेला रुग्णालयात दाखल केलं’

“संबंधित अधिकारी दहा मिनिटांच्या आतमध्ये पोहोचले. तेव्हा तिथे एका उघड्या टेम्पोच्या आतमध्ये पीडित महिला अत्यंत नाजूक परिस्थित आढळली. त्यावेळी त्यांनी तातडीने निर्णय घेऊन महिलेला इतरत शिफ्ट न करता त्या टेम्पोची चावी चौकीदाराकडून घेऊन स्वत: पोलिसांनी गाडी चालवत ताबोडतोब राजावाडी हॉस्पिटलमध्ये महिलेला दाखल केलं. डॉक्टरांनी पीडितेवर त्वरित उपचार सुरु केले होते”, अशी माहिती त्यांनी दिलीय.

वॉचमनच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल

“पोलिसांनी वॉचमनच्या तक्रारीवरुन साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत तपास सुरु केला. साकीनाका पोलीस ठाण्याचे कर्मचारी, क्राईम ब्रांचचे कर्मचारी सगळ्यांकडून तपास सुरु होता. संबंधित परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज चेक करण्यात आले. त्यावरुन एक आरोपी ज्याचं नाव मोहन आहे, तो युपीचा राहणारा आहे त्याला संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आलं. या आरोपीचे कपडे जप्त करण्यात आले. त्यावर रक्ताचे काही डाग आढळले आहेत. तपासातून ते महिलेचे रक्ताचे डाग आहेत ते खात्री करावे लागेल”, असं नगराळे म्हणाले.

आरोपीची 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी

“आरोपी मोहनला अटक केली आहे. त्याची 21 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी घेतलेली आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी एसीपी ज्योस्ना रासम या अनुभवी महिला अधिकारी आहेत. त्यांची तपास अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या हाताखाली एक स्पेशल इनव्हेस्टिगेशन टीम तैनात केली आहे. पुढच्या येणाऱ्या एक महिन्यात हा गुन्हा संपूर्णपणे उघडकीस आणू. त्याचा तपास पूर्ण करण्यात येईल. आताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं आहे की, हा गुन्हा फास्टट्रॅकवर चालवू”, असं आयुक्तांनी सांगितलं.

महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

“दुर्देवाने महिलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे या गुन्ह्याला आम्ही कलम 302 लावले आहे. काही संभ्रम या केसमध्ये होता. या प्रकरणात जास्त आरोपी आहेत. तसा विचार करुन आम्ही कलम 34 लावलं होतं. पण आतापर्यंतच्या तापासामध्ये फक्त एकच आरोपी आतातरी निषपन्न झाला आहे”, अशी माहिती त्यांनी दिली.

“पीडित स्त्रीचा जबाब रेकॉर्ड करता आला नाही. कारण महिला बेशुद्धच होती. त्यामुळे नेमकं घडलेलं काय आहे याच्याबद्दल आम्ही सध्या अनभिज्ञ आहोत. पण तपासात लवकरच याबाबत अधिक माहिती प्राप्त होईल. हा तपास लवकरच पूर्ण होईल आणि चार्जशीट दाखल होईल”, असं हेमंत नगराळे म्हणाले.

हेही वाचा :

आतडे कापले, प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकला, साकीनाका पीडितेच्या मृत्यूनंतर चित्रा वाघ हमसून हमसून रडल्या

आरोपीला 10 दिवसांची कोठडी, मुख्यमंत्री म्हणाले, सोडणार नाही, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.