Mumbai Gold Return : तब्बल 22 वर्षांनंतर मिळवले चोरीचे सोने, मुंबई पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी
चोरी झालेल्या वस्तू त्यांच्या पूर्वजांच्या आहेत. परिवारातील सदस्यांच्या भावना या वस्तूंसोबत जोडल्या आहेत. राजू दस्वानी आणि त्यांच्या दोन बहिणी या संपत्तीच्या कायदेशीर वारस आहेत. अमेरिकेत राहणाऱ्या दोन्ही बहिणींनी आधीच नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट दिलं आहे.
मुंबई : कुलाब्यातील एका व्यावसायिकाच्या घरुन चोरील गेलेले मौल्यवान दागिने(Gold Jwellery) तब्बल 22 वर्षांनी परत मिळविण्यास मुंबई पोलिसां(Mumbai Police)ना यश आले आहे. आताच्या बाजार भावानुसार या दागिन्यांची किंमत सुमारे दीड कोटी रुपये आहे. हे सोने संबंधित तक्रारदाराच्या कुटुंबियांना परत करण्यात करण्यात आले आहे. मुंबई पोलिसांच्या या कौतुकास्पद कारवाईमुळे तक्रारदारालाही सुखद धक्का बसला आहे. अर्जुन दस्वानी असे तक्रारदाराचे नाव आहे. दस्वानी यांचे 2007 मध्ये निधन झाले. 1998 मध्ये दस्वानी यांच्या घरी चोरी झाली होती. त्यानंतर हे प्रकरण न्यायप्रविष्ट होते. मुंबई पोलिसांच्या पाठपुराव्यामुळे दस्वानी कुटुंबाला आपले वडिलोपार्जित दागिने परत मिळाले आहेत. (Mumbai police have recovered jewelery stolen from the Daswani family 22 years ago)
1998 मध्ये कुलाब्यातील दस्वानी कुटुंबाच्या घरी झाली होती चोरी
मिळालेल्या माहितीप्रमाणे 8 मे 1998 रोजी मुंबईतील हाय प्रोफाईल परिसर असलेल्या कुलाबा येथे अर्जुन दस्वानी यांच्या घरी एका गँगकडून जबरी चोरी झाली होती. आरोपींनी दस्वानी यांच्या घराबाहेरील सुरक्षा रक्षकाला मारहाण करुन सेफच्या चाव्या हिसकावून घेतल्या आणि घरात प्रवेश केला. त्यानंतर दस्वानी आणि त्यांच्या पत्नीला बांधून ठेवून घरातील मौल्यवान दागिने घेऊन चोरटे पसार झाले होते. यानंतर 1998 मध्येच पोलिसांनी चार आरोपींना अटक केली होती. तर दोन आरोपी अद्याप फरार आहेत. अटक केलेल्या आरोपींकडून चोरी केलेला मुद्देमालही ताब्यात घेतला होता. मात्र 1999 मध्ये ट्रायलनंतर चौघांना सोडून देण्यात आलं होतं. या गुन्ह्यातील दोन फरार आरोपी जोपर्यंत सापडत नाहीत तोपर्यंत चोरट्यांकडून हस्तगत केलेला मुद्देमाल परत द्यायचा नाही, असा आदेश मुंबई सत्र न्यायालयाने 2002 मध्ये सुनावणीत दिला होता.
मुंबई पोलिसांच्या पाठपुराव्यामुळे 22 वर्षांनी मिळाले दागिने
याप्रकरणी न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना 2007 मध्ये तक्रारदार अर्जन दस्वानी यांचं निधन झालं. त्यानंतर दस्वानी कुटुंबियांचेही याकडे दुर्लक्ष झाले. दरम्यान, 2021 मध्ये मुंबई पोलिसांनी अनेक वर्षांपासून जप्त असलेल्या वस्तू तक्रारदारांना परत करण्यासंदर्भात न्यायालयात पाठपुरावा केला. न्यायालयाने परवानगी दिल्याानंतर पोलिसांनी राजू दस्वानी यांच्याशी पत्रव्यवहार केला. दस्वानींचे वकिल सुनिल पांडे म्हणाले की, कोर्टाचा हा आदेश ऐकून परिवाराला आनंद झाला. चोरी झालेल्या वस्तू त्यांच्या पूर्वजांच्या आहेत. परिवारातील सदस्यांच्या भावना या वस्तूंसोबत जोडल्या आहेत. राजू दस्वानी आणि त्यांच्या दोन बहिणी या संपत्तीच्या कायदेशीर वारस आहेत. अमेरिकेत राहणाऱ्या दोन्ही बहिणींनी आधीच नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट दिलं आहे. दरम्यान पोलिसांनी दस्वानी कुटुंबियांना त्याचे मौल्यवान दागिने परत केले. (Mumbai police have recovered jewelery stolen from the Daswani family 22 years ago)
इतर बातम्या