Mumbai Pune express Highway Accident : मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवरील 80% अपघातांना माणसंच जबाबदार!

घाट मार्गात ताशी 50 आणि इतर मार्गिकेवर ताशी 100ची वेगमर्यादा घालण्यात आलीय. पण तरिही अनेकदा मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात वाहनांना अतिवेग हा कैद झाल्याचंही पाहायला मिळालाय.

Mumbai Pune express Highway Accident : मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवरील 80% अपघातांना माणसंच जबाबदार!
धक्कादायक आकडेवारी..Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 26, 2022 | 10:48 AM

मुंबई : मुंबई पुणे एक्स्प्रेस (Mumbai Pune express Highway) वेवरील अपघातांबाबत महत्त्वाची आकडेवारी समोर आली आहे. जवळपास 80 टक्के अपघात हे मानवी चुकांमध्ये घडत असल्याची माहिती समोर आली आहे. सरकारी अधिकारी दिलेल्या आकडेवारीसून लेक कटींग, ओव्हरटेकींग, अतिवेग या कारणांसोबत मानवी चुकांमुळे 80 टक्के अपघात (Road accident) मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर घडतात, असं सांगण्यात आलंय. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतंवृत्त दिलं असून 1 जानेवारी ते 19 ऑगस्ट या काळात तब्बल 2.9 लाख अपघातांची नोंद करण्यात आलीय. त्यापैकी 16 हजार 918 जणांवर सीट बेल्ट न लावल्याणाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याचीही सरकारी आकडेवारी जारी करण्यात आलीय. त्याचप्रमाणे एक्स्प्रेस हायवेवर (Express Highway) बेकायदेशीरपणे वाहनं पार्किंग केल्यानंही अपघातांना निमंत्रण मिळत असल्याचं पाहण्यात आलंय. विनायक मेटे यांच्या मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवरील अपघाती मृत्यूनेतर मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवे प्रवास करण्याच्या दृष्टीने सुरक्षित किती आहे, अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. वेगवेगळ्या कारणांमुळे मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवे हा मृत्यूचा सापळा ठरत असल्याची कुजबूज सुरु झाली होती. त्या चर्चांना आता समोर आलेल्या आकडेवारीने चपराक लगावलीय.

अति वेग जीवघेणा

घाट मार्गात ताशी 50 आणि इतर मार्गिकेवर ताशी 100ची वेगमर्यादा घालण्यात आलीय. पण तरिही अनेकदा मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात वाहनांना अतिवेग हा कैद झाल्याचंही पाहायला मिळालाय. अनेक वाहनं वेगमर्यादा पाळत नसल्याने अपघात घडत असल्याचं निदर्शनास आलंय. गेल्या दीड वर्षांची आकडेवारी पाहता 131 जणांनी मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर जीव गमावलाय.

हे सुद्धा वाचा

धक्कादायक आकडेवारी

जानेवारी ते जुलै 2021 दरम्यान, 57 जणांनी मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर अपघातात प्राण गमावला होता. ही आकडेवारी 2022 मध्ये 43 इतकी झाली होती. अपघातातील मृतांचा आकडा गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी झाला असला तरी तो पूर्णपणे शून्यावर आणण्याचं ध्येय आम्ही ठेवलं पाहिजे, अशी गरज व्यक्त केली जातेय. विनायक मेटे यांचा मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर अपघाती मृत्यू झाला होता. पहाटे पाच साडेपाच वाजण्याच्या सुमारात हा भीषण अपघात झाला होता. मुंबईच्या दिशेने येत असताना विनायक मेटे यांचा अपघात झाला होता.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.