मुंबईत चार वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार, 28 वर्षीय आरोपीला बेड्या

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुलीला एकटंच पाहून आरोपीने तिला आईस्क्रिम देण्याच्या बहाण्याने बोलावलं. त्यानंतर मुलीला सोबत नेऊन तरुणाने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे.

मुंबईत चार वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार, 28 वर्षीय आरोपीला बेड्या
मुंबईत चिमुकलीवर बलात्कार
Follow us
| Updated on: Jul 18, 2021 | 8:10 AM

मुंबई : अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना मुंबईत उघडकीस आली आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. 4 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी 28 वर्षीय आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

मुंबईतील साकीनाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडितेच्या आईच्या निवेदनाच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करुन 28 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. आयपीसी कलम 376 सोबतच पॉक्सो अॅक्ट अंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुलीला एकटंच पाहून आरोपीने तिला आईस्क्रिम देण्याच्या बहाण्याने बोलावलं. त्यानंतर मुलीला सोबत नेऊन तरुणाने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. आरोपी आणि पीडित मुलगी एकाच परिसरात राहत असल्याची माहिती आहे.

पुण्यातही चिमुरडीवर बलात्कार

दुसरीकडे, काही दिवसांपूर्वीच चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली होती. कुरकुरे खायला देण्याचा बहाणा करुन बिहारी मजुराने चिमुरडीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडितेच्या आईच्या तक्रारीनंतर 30 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली होती.

पुण्यात सुरक्षारक्षकाकडूनही अत्याचार

याआधी, पुण्याच्या विमाननगरमध्ये पाच वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना काही महिन्यांपूर्वीही समोर आली होती. एका हॉटेलच्या सुरक्षारक्षकाने पाच वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार केल्याचा आरोप होता. पीडित चिमुरडी आपल्या आई-वडिलांसोबत एका लेबर कॅम्पमध्ये राहत होती. आई-वडील दोघेही कामावर गेल्यानंतर ती घरी एकटीच असते, हे आरोपीने हेरले होते. दुपारच्या सुमारास पाच वर्षांच्या चिमुरडीला तिच्या घरातून बाहेर बोलावत आरोपीने तिला आपण काम करत असलेल्या हॉटेल शेजारील एका चारचाकी शोरुमच्या पार्किंगमध्ये नेलं होतं, त्यानंतर तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप झाला होता.

संबंधित बातम्या :

जुन्या प्रेमावरुन वाद, रागाच्या भरात प्रियकराकडून चाकूने वार, महिलेची प्रकृती नाजूक

कुरकुरे देण्याच्या बहाण्याने पुण्यात चिमुरडीवर बलात्कार, 30 वर्षीय बिहारी तरुणाला अटक

(Mumbai Sakinaka 4 years old minor girl allegedly raped by neighbor)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.