Mumbai Crime : योगा टीचरचं विद्यार्थ्यासोबत घृणास्पद कृत्य! सांताक्रूझ पोलिसांकडून योगा टीचरला अटक
Santacruz Yoga Teacher : पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या शिक्षकाला अटक केली आहे.
मुंबई : एका योगा शिक्षिकाला (Yoga Teacher) अटक करण्यात आली आहे. विद्यार्थ्यासोबत अश्लिल चाळे केल्याप्रकरणी या शिक्षिकाला अटक करण्यात आली. 12 वर्षीय विद्यार्थ्यानं आपल्यासोबत झालेला प्रकार पालकांना सांगितला. त्यानंतर पालकांनी स्थानिक पोलिसांत (Santacruz Police) याबाबत तक्रार दिली. पालकांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांकडून योगा टीचरला अटक करण्यात आली आहे. सांताक्रूझ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही घटना घडली. योगा शिकवणाऱ्या एका 37 वर्षांच्या शिक्षकाला सांताक्रूझ पोलिसांनी घृणास्पद कृत्य केल्याप्रकरणी बेड्या (Mumbai Crime News) ठोकल्या. योगा शिकण्यासाठी येणाऱ्या एका 12 वर्षांच्या विद्यार्थ्याने या शिक्षकाविरोधात तक्रार दिली होती. या शिक्षकाने अश्लील चाळे केल्याचा आरोप विद्यार्थ्यानं केला होता. याबाबत पालकांना माहिती दिल्यानंतर विद्यार्थ्यांच्या पालकांनी सांताक्रूझ पोलीस स्थानकात धाव घेत तक्रार दिली होती.
…म्हणून योगा क्लास लावला! पण…
पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या शिक्षकाला अटक केली आहे. अनिल राजभर असं अटक कऱण्यात आलेल्या योगा टीचरचं नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेशचा आहे. सांताक्रूझमध्ये मोकळ्या जागेत तो योगाचं प्रशिक्षण द्यायचा. पीडित विद्यार्थ्याच्या पालकांनी या मुलाला मोबाईलमध्ये वेळ घालवण्यापेक्षा वेळ सत्कर्णी लागावा म्हणून त्याला योगा क्लासला घातलं होतं. पण तिथं त्याच्यासोबत विचित्रच प्रकार घडला.
घृणास्पद कृत्य
पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार योगा टीचर राजभर हा 12 वर्षांच्या विद्यार्थ्याला घरी घेऊन गेला. तेव्हा राजभरने त्याला अयोग्यरीत्य स्पर्थही केला. तसंच त्याला ओरल सेक्स करण्यास भाग पाडलं. यानंतर घडलेला प्रकार कुणालाही न सांगण्याची धमकीही दिली होती. यानंतर विद्यार्थ्यानं पालकांना आपल्यासोबत घडलेला प्रसंग सांगितल्यानंतर तेही हारुन गेले.
अधिक तपास सुरु
आता सांताक्रूझ पोलिसांनी याप्रकरणी शिक्षकावर अटकेची कारवाई केली असून शिक्षकाची चौकशी केली जातेय. तसंच विद्यार्थ्यांचीही चौकशी पोलीस करत असून इतरही कुणासोबत योगा टीचरनं घृणास्पद कृत्य केलं नाहीये ना, याचा तपास केला जातोय. सांताक्रूझ पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पीआय बाळासाहेब तांबे यांनी याबाबतची माहिती दिलीय.