Kadar Dighe : केदार दिघे यांच्यावरील आरोपांवर कोर्टातून मोठी अपडेट! बलात्काराच्या आरोपावर कोर्ट म्हणालं की…

केदार दिघे यांनी 1 ऑगस्ट रोजी ठाणे जिल्हा शिवसेना प्रमुखपदी निवड करण्यात आलेली.

Kadar Dighe : केदार दिघे यांच्यावरील आरोपांवर कोर्टातून मोठी अपडेट! बलात्काराच्या आरोपावर कोर्ट म्हणालं की...
ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 10, 2022 | 1:26 PM

मुंबई : केदार दिघे (Kedar Dighe News) यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. केदार दिघे यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांवरही कोर्टानं (Mumbai Session Court) महत्त्वपूर्ण टिप्पणी केली. मुंबई सत्र न्यायालयात याप्रकरणी सुनावणी पार पडली असताना कोर्टानं म्हटलंय की, केदार दिघे यांच्यावर बलात्काराचा (Rape case) आरोप नाही, केवळ धमकीचा आरोप आहे. त्यामुळे त्यांना अशा स्थितीत कोणत्याही कोठडीची आवश्यकता नाही. ते तपासाला सहकार्य करणार असल्याबाबत आश्वस्त करत असल्यामुळे त्यांना जामीन दिला जाऊ शकतो, असं कोर्टानं म्हटलंय. ठाणे जिल्हा शिवेसना प्रमुख केदार दिघे यांच्यावर बलात्कार आणि धमकीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर केदार दिघे यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. त्यामुळे त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. याप्रकरणी अखेर त्यांचा अर्ज मान्य करण्यात आला आल्यानं मोठा दिलासा मिळालाय.

काय आहे प्रकरण?

केदार दिघे यांच्यावरती एका तरुणीनं धमकी दिल्याचा आरोप केला होता. दिघे यांच्या मित्रावर 23 वर्षांच्या तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आलाय. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह एकूण सहा जणांवर गुन्हा नोंदवला होता. त्यात केदार दिघे यांचाही समावेश असून केदार दिघे यांना अटक करण्यात येईल, अशी शक्यता निर्माण झाली होती. अखेर आता केदार दिघे यांना दिलासा मिळाला असून त्याच्यावरील अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केलाय. तपासात सहाकार्य करण्याच्या अटीवर त्यांचा अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने मान्य केला आहे.

दिघेंनी नेमकं काय म्हटलं?

केदार दिघे यांनी 1 ऑगस्ट रोजी ठाणे जिल्हा शिवसेना प्रमुखपदी निवड करण्यात आलेली. याच दिवशी केदार दिघे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीला गेले होते. तसंच नंतर त्यांनी शिवाजी मार्कवरही जात बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी भेट दिली होती. दरम्यान, त्यांना एक फोन कॉल आला होता. हा फोन कॉल कामदार संघटनेच्या पदाधिकाऱ्याचा होता. या व्यक्तीने सहआरोपी आणि पीडिता यांच्यामध्ये वाद झाला असल्याची माहिती दिली. त्यानंतर पीडितेसोबत गैरवर्तन झाल्याचं कळलं, अशी माहितीही केदार दिघे यांनी कोर्टात दिली. दरम्यान, हे प्रकरण मिटवण्यासाठी पीडितेने सहआरोपींकडे पैशांची मागणी केल्याचा आरोपही केदार दिघे यांनी केला होता. पीडितेचं म्हणणं खोटं असून तिने केलेल्या आरोपात तत्थ्य नसल्याचाही दावा दिघे यांनी अटकपूर्व सामीनासाठी अर्ज करताना केला होता.

हे सुद्धा वाचा

दुसरीकडे पोलिसांच्या वतीने हा जामीनअर्ज मान्य केला जाऊ नये, असा युक्तिवाद करण्यात आला. तपास आता महत्त्वाच्या टप्प्यामध्ये असून हा जामीन अर्ज मंजूर करु नये, असं पोलिसांनी म्हटलंय. मात्र दिघे हे तपासाला सहकार्य करतील, अशा अटीवर त्यांचा जामीनअर्ज मान्य करण्यात आलाय.

Non Stop LIVE Update
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.