Electricity bill | मुंबईत लाईट बिल भरण्याच्या नावाखाली एक महिलेची 1.37 लाखांना अशी झाली फसवणूक

Electricity bill fraud | असा फोन कॉल तुम्हाला सुद्धा येऊ शकतो, त्यामुळे ही बातमी वाचून वेळीच सावध व्हा. नेमकं काय घडलं? लाईट बिल भरताना एक महिलेची इतकी मोठी फसवणूक कशी झाली?

Electricity bill | मुंबईत लाईट बिल भरण्याच्या नावाखाली एक महिलेची 1.37 लाखांना अशी झाली फसवणूक
Fraud Calls Online Fraud Cyber Crime
Follow us
| Updated on: Oct 03, 2023 | 3:13 PM

मुंबई : लाईट बिल भरण्यात मदत करतो सांगून एका सायबर घोटाळेबाजाने मुंबईत राहणाऱ्या एका 37 वर्षीय महिलेला 1.37 लाख रुपयांना फसवलं. पोलिसांनी सोमावारी ही माहिती दिली. अंधेरी पश्चिमेला महिला तिच्या आईसोबत राहते. आई ज्येष्ठ नागरिक आहे. वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी गेल्यानंतर हा प्रकार समोर आला. महिलेच्या आईच्या मोबाइलवर शुक्रवारी एक मेसेज आला. त्यात “रात्री 9.30 वाजेपर्यंत वीज बिल भरलं नाही, तर लाईट कापली जाईल” असं म्हटलं होतं.

मोबाइलवर आधी मेसेज आला. त्यानंतर तक्रारदार महिलेच्या 62 वर्षीय आईला घोटाळेबाजाने फोन केला. लाईट बिल भरलं नाही, तर वीज कापण्याची धमकी त्याने दिली. सायबर गुन्हेगाराने त्यानंतर तक्रारदार महिलेचा मोबाइल नंबर मिळवला व तिला व्हिडिओ कॉल केला. ऑनलाइन इलेक्ट्रिसिटी बिल भरण्यासाठी मदत करण्याची घोटाळेबाजाने तयारी दाखवली. पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलय. घोटाळेबाजाने असं फसवलं

मदत करण्याच्या नावाखाली घोटाळेबाजाने महिलेच बँक अकाऊंट आणि डेबिट कार्डाचे डिटेल मिळवले. त्यातून त्याने अनधिकृतपण व्यवहार करत 1.37 लाख रुपयांना महिलेची फसवणूक केली. तक्रारीच्या आधारावर अज्ञात व्यक्तीविरोधात FIR नोंदवण्यात आलाय. पुढील तपास सुरु आहे.

Non Stop LIVE Update
मोहोळमध्ये सर्वात कमी वयाच्या उमेदवार, सिद्धी कदम आहे तरी कोण?
मोहोळमध्ये सर्वात कमी वयाच्या उमेदवार, सिद्धी कदम आहे तरी कोण?.
शरद पवारांची खेळी, आमदाराची ‘लाडकी लेक’ उतरवली विधानसभेच्या मैदानात
शरद पवारांची खेळी, आमदाराची ‘लाडकी लेक’ उतरवली विधानसभेच्या मैदानात.
नवाब मलिकांच्या लेकीविरूद्ध 'या' अभिनेत्रीचा पती निवडणुकीच्या रिंगणात
नवाब मलिकांच्या लेकीविरूद्ध 'या' अभिनेत्रीचा पती निवडणुकीच्या रिंगणात.
एकनाथ शिंदेंना धक्का, शिंदे गटाला सोडचिठ्ठी देत माजीमंत्र्याची घरवापसी
एकनाथ शिंदेंना धक्का, शिंदे गटाला सोडचिठ्ठी देत माजीमंत्र्याची घरवापसी.
“एकाचं कल्याण करून दिल्लीला पाठवलं तर दुसऱ्याचं बिस्मिल्ला करून...”
“एकाचं कल्याण करून दिल्लीला पाठवलं तर दुसऱ्याचं बिस्मिल्ला करून...”.
जयंत पाटलांकडून तिसरी यादी जाहीर, आणखी 9 शिलेदार विधानसभेच्या रिंगणात
जयंत पाटलांकडून तिसरी यादी जाहीर, आणखी 9 शिलेदार विधानसभेच्या रिंगणात.
संजय शिरसाट अचानक जरांगेंच्या भेटीला,अंतरवालीत दोघांत काय झाली चर्चा?
संजय शिरसाट अचानक जरांगेंच्या भेटीला,अंतरवालीत दोघांत काय झाली चर्चा?.
आमचा कारभार जनतेतून, मी पहाटे उठून..., हर्षवर्धन पाटलांचा दादांना टोला
आमचा कारभार जनतेतून, मी पहाटे उठून..., हर्षवर्धन पाटलांचा दादांना टोला.
'अटक मला करा...', जयश्री थोरातांसह 50 जणांवर गुन्हा, काय आहे प्रकरण?
'अटक मला करा...', जयश्री थोरातांसह 50 जणांवर गुन्हा, काय आहे प्रकरण?.
अजित दादा गटाची तिसरी यादी जाहीर; या उमेदवारांना विधानसभेच मिळाल तिकीट
अजित दादा गटाची तिसरी यादी जाहीर; या उमेदवारांना विधानसभेच मिळाल तिकीट.