Borivali Murder : आईशी अनैतिक संबंध असल्याचा संशय, मित्राची चालत्या मालगाडीसमोर ढकलून हत्या

गुरुवारी रात्री बोरीवली ते कांदिवली दरम्यान पोईसर रेल्वे ट्रॅकवर पोलिसांना एक मृतदेह आढळून आला होता. मयत तरुणाच्या शरीरावर काही जखमा होत्या. या जखमांच्या खुणा पाहून पोलिसांनी ही हत्या असल्याचा संशय आला.

Borivali Murder : आईशी अनैतिक संबंध असल्याचा संशय, मित्राची चालत्या मालगाडीसमोर ढकलून हत्या
आईशी अनैतिक संबंध असल्याचा संशय, मित्राची चालत्या मालगाडीसमोर ढकलून हत्या
Follow us
| Updated on: Jan 28, 2022 | 11:54 PM

मुंबई : आपल्या आईशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून मित्राने मित्राची मालगाडीसमोर ढकलून हत्या (Murder) केल्याची घटना बोरीवलीत घडली आहे. आरोपीने आधी मयत तरुणाला रेल्वे ट्रॅकजवळ नेऊन मारहाण केली त्यानंतर समोरुन येणाऱ्या मालगाडीसमोर ढकलले. यात पीडित तरुणाचा मृत्यू झाला. गणेश नरसिंग मुखिया (22) असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी बोरीवली जीआरपी पोलिसां(Borivali GRP Police)नी आरोपीला काही तासांतच अटक केली आहे. अशोक मुखिया असे आरोपीचे नाव आहे. मयत गणेश मुखिया हा मूळचा रहिवासी असून महिनाभरापूर्वीच मुंबईत कामधंदा करण्यासाठी आला होता. मात्र संशयातून मित्रानेच त्याचा घात केला. याप्रकरणी बोरीवली जीआरपी पोलीस कारवाई करीत आहेत. (Murder of a friend in Borivali on suspicion of having an affair with his mother)

मयताच्या शरीरावर जखमा दिसल्याने पोलिसांना संशय आला

बोरिवली जीआरपी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री बोरीवली ते कांदिवली दरम्यान पोईसर रेल्वे ट्रॅकवर पोलिसांना एक मृतदेह आढळून आला होता. मयत तरुणाच्या शरीरावर काही जखमा होत्या. या जखमांच्या खुणा पाहून पोलिसांनी ही हत्या असल्याचा संशय आला. पोलिसांनी याबाबत तपास सुरू केला असता, मयत हा बोरिवली ते कांदिवली दरम्यानच्या रेल्वे ट्रॅकच्या बाजूला असलेल्या झोपडपट्टी भागातील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्याच्यासोबत राहणाऱ्या मित्राला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता मयत तरुणाची ओळख पटली.

आईसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून मित्राची हत्या

गणेश महिनाभरापूर्वीच मुंबईत आला होता आणि आपल्या घरी राहून फ्रँकीचा व्यवसाय करायचा, अशी माहिती आरोपीने पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. गणेश हा आरोपी अशोकच्या आईसोबत वारंवार फोनवर बोलत असे. यामुळे गणेश आणि आपल्या आईमध्ये अनैतिक संबंध सुरु आहेत, असा संशय अशोकला होता. याच संशयातून त्याने गणेश काटा काढायचा ठरवले. त्याप्रमाणे गुरुवारी तो गणेशला रेल्वे ट्रॅकजवळ घेऊन गेला. तिथे नेऊन त्याला मारहाण केली. त्यानंतर त्याला मालगाडीसमोर ढकलून दिले, असे आरोपीने पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक करुन पुढील कारवाई सुरु केली. (Murder of a friend in Borivali on suspicion of having an affair with his mother)

इतर बातम्या

Mumbai High Court : मुलगी ही काही मालमत्ता नाही दान द्यायला, मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

Supreme Court : तडीपारीचा आदेश एक असाधारण उपाय, सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.