Murder | माहीम बीचवर तरुणाची हत्या! हल्ल्यात जखमी झालेल्या प्रेसयीचाही हत्येमागे हात, का केला खून?

Mahim Beach Murder : मोहम्मद वासिम शेख असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. पोलिसांनी या हत्येप्रकरणी आधीच दोघांना अटक केली होती.

Murder | माहीम बीचवर तरुणाची हत्या! हल्ल्यात जखमी झालेल्या प्रेसयीचाही हत्येमागे हात, का केला खून?
माहीम किनाऱ्याचं प्रातिनिधिक दृश्य
Follow us
| Updated on: Feb 05, 2022 | 12:39 AM

मुंबई : 1 फेब्रुवारीला एक धक्कादायक घटना समोर आली होती. माहीम किनाऱ्यावर एका तीस वर्षांच्या व्यक्तीची हत्या (Murder at Mahim Beach) करण्यात आला होता. प्रथमदर्शनी एका कपलवर हल्ला करण्यात आल्याचं समोर आलं होतं. यातील तरुणाचा हल्ल्यात जीव गेला होता. यानंतर प्रेससी जखमी झाली होती. मात्र धक्कादायका बाब म्हणजे प्रेयसीचाही (Girl friend involved in murder case of her boy friend) या हत्याकाडांत हात असल्याचं पोलिस तपासात (Police investigation of Murder) समोर आलंय. जखमी प्रेयसीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु असून तिला देखील पोलिस अटक करण्यात असल्याची माहिती समोर आली आहे. मोहम्मद वासिम शेख असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. पोलिसांनी या हत्येप्रकरणी आधीच दोघांना अटक केली होती. त्यानंतर आता माहीम बीचवर घडलेल्या या हत्याकांडात जखमी झालेली तरुणीचा देखील हात असल्याचं निष्पन्न झालंय. ही तरुणी आणि हत्या करण्यात आलेला तरुण शिवाजी नगर गोवंडीचे रहिवासी असल्याची माहितीदेखील समोर आली आहे.

हल्ल्यानंतर जखमी तरुणीचा पळ

माहीम बीचवर येण्याआधी हे कपल देवस्थानाला भेट देऊन आलं होतं. माहीम किनाऱ्यावर जिथं फारशी कुणाची ये-जा नसते, अशा ठिकाणी हे कपल बसलं होतं. यानंतर अचानक दोघांनी येऊन या कपलवर हल्ला केला.

या हल्ल्यामध्ये जखमी झालेली तरुणी पळ काढण्यात यशस्वी झाली होती. सुरुवातील तरुणी वांद्रेतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तर पोलिसांना याबाबत माहिती दिल्यानंतरया तरुणीला सायन रुग्णालयात आणण्यात आलं होतं.

तरुणीची कसून चौकशी

या तरुणीच्या चौकशीनंतर वासिम शेख याचा मृतदेह पोलिसांना आढळला होता. वासिम हा नुकताच भारतात परतला होता. तो दुबईत टॅक्सी ड्रायव्हरचं काम करत असल्याचीही माहिती समोर आली आहे. दरम्यान, या हत्येप्रकरणी पोलिसांनी नागपुरातून फरार असलेल्या दोघा संशयित आरोपींना याआधीच अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी या तरुणीचीही कसून चौकशी सुरु ठेवली होती.

अखेर आता या तरुणीचाही या हत्येमागे हात असल्याचं समोर आलं आहे. सेक्सटोर्शन आणि ड्रग्स या दोन कारणांमुळे ही हत्या करण्यात आल्याचं पोलिसांच्या तपासातून समोर आलं आहे.

संबंधित बातम्या :

धंदा बसल्यानं जीवावर उठला! तलवार, चॉपरने थरारक हल्ला! उल्हासनगरात व्यापाऱ्याच्या जीवावर कोण उठलंय?

तिघेही बंधाऱ्यात पडले! बाबा वाचले, आई बेपत्ता, नाकातोंडात पाणी जाऊन 1 वर्षाचं बाळ तडफडून दगावलं

अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी गेलेल्या पालिका कर्मचाऱ्यांच्या वाहनांवर हल्ला

सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.