Video : नालासोपाऱ्यात भररस्त्यात गर्दुल्यांची दादागिरी! रस्त्यात अडवून बेदम मारहाण, परिसरात तणाव

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक तरुण हातात रस्त्यावर पडलेली एका लाकडाची वस्तू घेऊन हल्ला करण्यासाठी पुढे सरसावतो. पण एक जण त्याला थांबवतो.

Video : नालासोपाऱ्यात भररस्त्यात गर्दुल्यांची दादागिरी! रस्त्यात अडवून बेदम मारहाण, परिसरात तणाव
नालासोपाऱ्यात राडाImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 04, 2022 | 10:35 AM

नालासोपारा : नालासोपाऱ्यात (Nalasopara News) गर्दुल्याच्या टोळींची दादागिरी दिवसागणिक वाढत चालली आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या एका तरुणाला अडवून, या गर्दुल्याच्या टोळीने भर रस्त्यात लाथा बुक्यांनी आणि हातात पडेल त्याने बेदम मारहाण (men beaten) केली. या घटनेचा व्हिडीओदेखील (Nalasopara Crime) समोर आला आहे. हा मारहाणीचा सर्व प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला असून, ही मारहान हे टोळकं का करतंय, हे मात्र स्पष्ट झालं नाही. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Socia Media Viral) झाला आहे. त्यामुळे नालासोपाऱ्यात गर्दुल्यांची दहशत पसरली आहे. नालासोपारा पूर्व 90 फिट रोडवर विरार मोहक सिटी ते नालासोपारा रोडवर शुक्रवारी रात्री 8 च्या सुमारास ही घटना घडली. 4 ते 5 तरुण एका इसमाला लाथाबुक्याने बेदम मारहाण करताना दिसत आहेत. यावेळी रस्त्यावर बघ्यांची गर्दी आहे. पण गर्दुल्याच्या दहशतीने कोणीही तरुणाच्या मदतीला येताना दिसत नाहीये. सध्या तरी या मारहाण प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र या व्हायरल व्हिडीओनंतर पोलीस नेमकी काय कारवाई करतात, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

व्हिडीओमध्ये काय?

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक तरुण हातात रस्त्यावर पडलेली एका लाकडाची वस्तू घेऊन हल्ला करण्यासाठी पुढे सरसावतो. पण एक जण त्याला थांबवतो. यावेळी मोठी बाचाबाची झाल्याचं दिसून आलंय. तर रस्त्यावरील अन्य जण राडा बघण्यासाठी गर्दी केल्याचंही व्हिडीओत दिसतंय. मात्र एकही जण राडा थांबवण्यासाठी हिंमत करुन पुढे आला नाही. यावरुनच नालासोपाऱ्यात गर्दुल्यांची किती दहशत आहे, याची कल्पना करता येऊ शकेल.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच विरार रेल्वे स्थानकातही एका प्रवाशाला लुबाडण्यात आलं होतं. विरार रेल्वे स्थानकात एका प्रवाशाला मारहाण करत तिघांनी लुटलं होतं. सरकत्या जिन्यावरुन रात्रीच्या सुमारास कुणी नाही हे पाहून एका प्रवाशाला मारहाण करत त्याचा मोबाईल फोन आणि पैसे लुटण्याता आले होते. यात रेल्वे प्रवासी गंभीर जखमी देखील झाला होता.

हे सुद्धा वाचा

विरारमधील प्रवाशाला लुटल्याची घटना ताजी असतानाच आता विरारच्या शेजारी असलेल्या नालासोपाऱ्यात भररस्त्यात लुटमारीची घटना घडली. या घटनेने परिसरात दहशत पसरली असून पोलिसांना धाक या भागात उरलाय की नाही, असा सवाल उपस्थित केला जातोय.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.