पत्नीच्या मृत्यूचा बनावट दाखला बनवून लाटली संपत्ती, नवी मुंबईतील धक्कादायक प्रकार उघड
जिवंत असलेल्या पत्नीचा मृत्यू दाखला बनवून पतीने पत्नीच्या नावे असलेली संपत्ती हडपल्याचा प्रकार उघड झाला आहे. यामध्ये नेरुळच्या रुग्णालयाने हयात असलेल्या महिलेचा मृत्यू दाखला दिल्याचे समोर आले आहे. त्यानुसार पती आणि रुग्णालयाविरोधात महिलेने पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला आहे.
नवी मुंबई : जिवंत असलेल्या पत्नीचा मृत्यू दाखला बनवून पतीने पत्नीच्या नावे असलेली संपत्ती हडपल्याचा प्रकार उघड झाला आहे. यामध्ये नेरुळच्या रुग्णालयाने हयात असलेल्या महिलेचा मृत्यू दाखला दिल्याचे समोर आले आहे. त्यानुसार पती आणि रुग्णालयाविरोधात महिलेने पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला आहे.
विजया रेड्डी गंगाडी (वय 58) या महिलेसोबत हा प्रकार घडला आहे. त्या जिवंत असतानादेखील त्यांचा मृत्यू दाखला वापरुन त्यांची तेलंगणा येथील जमीन, नेरुळचे घर यांची विक्री करण्यात आली आहे. त्याशिवाय, त्यांच्या बँकेच्या व्यवहारातही या दाखल्याचा वापर करण्यात आला आहे.
पतीनेच केली फसवणूक
आपल्या पतीनेच ही फसवणूक केल्याचा आरोप महिलेने केला आहे. याप्रकरणी तक्रार अर्ज त्यांनी पोलिसांकडे दिला आहे. पतीसोबतच्या भांडणाला कंटाळून त्या 2015 मध्ये आंध्र प्रदेश याठिकाणी निघून गेल्या होत्या. यादरम्यान 2020 मध्ये त्यांनी तेलंगणा येथे त्यांच्या नावे असलेल्या जमिनीची चौकशी केली असता ती जमीन विकण्यात आली असल्याचे समोर आले. यामुळे त्यांनी व्यवहारासाठी वापरण्यात आलेल्या कागदपत्रांची पाहणी केली असता, विजया या जिवंत असतानाही त्यांच्या पतीने त्यांचा मृत्यू दाखला वापरुन हा व्यवहार केल्याचे समोर आले.
ही बाब निदर्शनास आल्यानंतर तेथील तहसीलदार कार्यालयामार्फत पती वेंकट रेड्डीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी वापरलेला मृत्यू दाखल हा नेरुळच्या रुग्णालयाचा आहे. या रुग्णालयाने कोणत्या आधारावर त्यांना हा मृत्यू दाखला दिला याच्या चौकशीची मागणी त्यांच्याकडून होत आहे.
उत्तर प्रदेशातून महाराष्ट्रात आले, उबेर बुक केली, केवळ दोन लाखांसाठी निघृण कृत्य, सुन्न करणारी घटनाhttps://t.co/X28S4G0kpS#Crime #Kalyan #Murder
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 12, 2021
संबंधित बातम्या :
परदेशातून कुटुंबाला भेटायला वसईत, वॉकिंग करताना मद्यधुंद दुचाकीस्वाराच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
भाजप आमदाराच्या मुलाला गंडवणारा आरोपी अखेर जेरबंद, वाचा नेमकं प्रकरण काय?