Navi Mumbai Accident | रिक्षाला वाचवताना फॉर्च्युनर दुभाजकावर आदळली, 3 ते 4 वेळा उलटली, एकाचा मृत्यू

गाडी तीन ते चार वेळा पलटी मारुन पुढे बरोबर शंभर मीटर अंतरावर जाऊन आदळली. या अपघातात फॉर्च्युनरमध्ये असलेले पाच जण आणि रिक्षामध्ये असलेले दोघे प्रवासी जखमी झाले.

Navi Mumbai Accident | रिक्षाला वाचवताना फॉर्च्युनर दुभाजकावर आदळली, 3 ते 4 वेळा उलटली, एकाचा मृत्यू
नवी मुंबईत रिक्षा-फॉर्च्युनरचा अपघात
Follow us
| Updated on: Dec 13, 2021 | 8:14 AM

नवी मुंबई : रिक्षा सिग्नल तोडून जात असताना त्याच मार्गावरुन भरधाव फॉर्च्युनर कार चालली होती. यावेळी रिक्षाला वाचवण्याच्या प्रयत्नात कार डाव्या बाजूला दुभाजकाला ठोकून 3 ते 4 वेळा उलटली आणि शंभर मीटर अंतरावर जाऊन आदळली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून चौघे जण गंभीर जखमी झाले आहेत. नवी मुंबईत रविवारी हा अपघात झाला.

नेमकं काय घडलं?

नवी मुंबईतील पामबीच मार्ग अक्षर सिग्नलवर बेलापूरकडून सीवूड्सच्या दिशेने जाणारी रिक्षा सिग्नल तोडून जात होती. तेवढ्याच कालावधीमध्ये अतिशय वेगाने फॉर्च्युनर कार वाशीकडून बेलापूरच्या दिशेने चालली होती. यावेळी रिक्षाला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना फॉर्च्युनर डाव्या बाजूला डिव्हायडरवर आपटली.

एकाचा मृत्यू, चौघे गंभीर

गाडी तीन ते चार वेळा पलटी मारुन पुढे बरोबर शंभर मीटर अंतरावर जाऊन आदळली. या अपघातात फॉर्च्युनरमध्ये असलेले पाच जण आणि रिक्षामध्ये असलेले दोघे प्रवासी जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी दाखल झाले असून पुढचा तपास एनआरआय पोलीस करत आहेत.

वाहनचालकांवर निर्बंध नाही

पामबीच मार्गावर स्पोर्ट्स बाईक आणि कार अतिशय वेगाने चालवले जातात आणि वेळोवेळी वाहतूक पोलिसांकडून कारवाईही केली जाते, मात्र वाहन चालकांवर कुठलाही परिणाम होत नसल्यामुळे अशा घटना वारंवार घडत आहेत. पोलीस आणि पालिका प्रशासन यावर काही उपयोजना करावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.

संबंधित बातम्या :

अख्खं गाव लुटण्याचा बेत, हातात काठ्या, 40 घरांच्या कड्या लावल्या, पैठणमधील वडजीत शेतकऱ्याला सात लाखांना लुटलं!

नाशिकच्या सिडको परिसरात आढळला अनोळखी तरुणाचा मृतदेह; घातपाताचा संशय

आईने केला पोटच्या पोराचा सौदा; पोलीस बनले ग्राहक, सहा जणांना अटक

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.