AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘हे तुझं प्रोडक्शन हाऊस नाही, NCB कार्यालय आहे’, समीर वानखेडे अनन्या पांडेवर भडकले, ऑफिसमध्ये नेमकं काय घडलं?

एनसीबी कार्यालयात उशिरा पोहोचलेल्या अभिनेत्री अनन्या पांडेला एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी चांगलंच फैलावर घेतलं. हे तुझं प्रोडक्शन हाऊस नाही, हे NCB कार्यालय आहे', अशा शब्दात समीर वानखेडे यांनी अनन्या पांडेला खडसावलं.

'हे तुझं प्रोडक्शन हाऊस नाही, NCB कार्यालय आहे', समीर वानखेडे अनन्या पांडेवर भडकले, ऑफिसमध्ये नेमकं काय घडलं?
समीर वानखेडे आणि अनन्या पांडे
Follow us
| Updated on: Oct 23, 2021 | 9:34 AM

मुंबई :  एनसीबी कार्यालयात उशिरा पोहोचलेल्या अभिनेत्री अनन्या पांडेला एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी चांगलंच फैलावर घेतलं. हे तुझं प्रोडक्शन हाऊस नाही, हे NCB कार्यालय आहे’, अशा शब्दात समीर वानखेडे यांनी अनन्या पांडेला खडसावलं. सकाळी 11 वाजता चौकशीसाठी बोलावलेली अनन्या एनसीबीच्या कार्यालयात दुपारी 2 वाजता गेली. यामुळे समीर वानखेडे यांचा चांगलाच पारा चढला.

आर्यन खान ड्रग्ज केस प्रकरणात अभिनेत्री अनन्या पांडेचं नाव समोर आलं आहे. तिने आर्यन खानशी ड्रग्जसंबंधित व्हॉट्सअप चॅट केल्याचं समोर आलं आहे. याचप्रकरणी एनसीबी तिची चौकशी करत आहे. गुरुवारी अनन्या पांडेचं नाव समोर आल्यानंतर एनसीबीने थेट अनन्याचं घर गाठलं. तिला दुपारी चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स दिलं. तिची त्याच दिवशी 2 तास चौकशीही केली गेली. काल (शुक्रवारी) पुन्हा एकदा अनन्याला चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. मात्र अनन्या उशिरा गेल्याने समीर वानखेडे यांचा चांगलाच पारा चढला.

NCB च्या ऑफिसमध्ये नेमकं काय घडलं?

अनन्या पांडेला शुक्रवारी सकाळी 11 वाजता चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. पण अगोदरच्या दिवशी एनसीबीने सुमारे सव्वा दोन तास चौकशी केल्याने अनन्या अगोदरच डिप्रेशनमध्ये आली होती. ती खूपच भेदरलेली होती. त्यामुळे शुक्रवारी अकरा वाजताची वेळ असताना देखील ती चौकशीसाठी दुपारी 2 वाजता एनसीबी ऑफिसमध्ये पोहोचली.

अनन्याची चौकशी वेळ 11 वाजता होती. त्यामुळे चौकशी अधिकारी अगोदरच ऑफिसमध्ये आले होते. एनसीबीच्या अधिकाऱ्यांना तब्बल तीन तास अनन्याने वाट पाहायला लावली. ती दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास एनसीबीने कार्यालयात पोहोचली.

यावेळी एनसीबी अधिकाऱ्यांना ताटकळत ठेवणाऱ्या अनन्या पांडेचा झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी चांगलाच समाचार घेतला. “तुला 11 वाजता बोलावलं होतं, तू दोन वाजता कशी काय येऊ शकतेस? प्रोडक्शन हाऊस समजलीस काय, पण हे NCB कार्यालय आहे, हे लक्षात ठेव”, अशा शब्दात समीर वानखेडे यांनी अनन्याला खडसावलं.

एनसीबीकडून अनन्याची दोन तास चौकशी

अनन्या पांडे ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या तावडीत अडकली आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी एनसीबीने आर्यन खान ड्रग्स प्रकरणाबाबत अनन्या पांडेची 2 तास चौकशी केली. आर्यन खान आणि अनन्या पांडेच्या गप्पांमध्ये आर्यन अनन्याशी एका ठिकाणी गांजाबद्दल बोलत होता. आर्यन विचारत होता की, काही जुगाड होऊ शकते का? यावर अनन्याने उत्तर दिले आणि सांगितले की, “मी व्यवस्था करीन”, असं चॅटमध्ये समोर आलंय.

ड्रग्स चॅटवर अनन्याने एनसीबीला काय उत्तर दिले?

एनसीबीने अनन्याला हे चॅट दाखवले आणि काही प्रश्न विचारले, ज्यावर अनन्या म्हणाली की, ती फक्त विनोद करत होती. अनन्या पांडेने एनसीबीच्या अधिकाऱ्यांना सांगितले की आर्यनशी तिच्या गप्पा ड्रग्सबद्दल नाही तर सिगारेटबद्दलच्या आहेत. दोघांमध्ये सिगारेटबद्दल संभाषण झाले होते. अनन्याने सांगितले की, तिने कधीही ड्रग्जचे सेवन केले नाही.

एनसीबीच्या मते, आतापर्यंत असे कोणतेही पुरावे सापडले नाहीत की अनन्याने आर्यनसाठी कधीच कोणत्याही ड्रग्जची व्यवस्था केली आहे. मात्र, आर्यन-अनन्या यांनी ड्रग्जबाबत एकदा नव्हे, तर अनेक वेळा संभाषण केले आहे.

(NCB Zonal director Sameer Wankhede got angry with Ananya Pandey Arrived late at NCB office Aryan Khan Drugs Case)

हे ही वाचा :

Ananya Panday | NCB चौकशीच्या आधी वडिलांना बिलगून रडली अनन्या पांडे, ‘ड्रग्ज घेतेस का?’वर उत्तर देताना म्हणाली…

पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?.
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय.
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर.
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?.
पाकिस्तानच्या 12 शहरांमध्ये भारताकडून 50 ड्रोन हल्ले
पाकिस्तानच्या 12 शहरांमध्ये भारताकडून 50 ड्रोन हल्ले.
मोठी बातमी! भारतीय लष्कराकडून पाकिस्तानी रडार सिस्टिम उद्धवस्त
मोठी बातमी! भारतीय लष्कराकडून पाकिस्तानी रडार सिस्टिम उद्धवस्त.
पाकिस्तानच्या अनेक शहरांमध्ये वाजले सायरन
पाकिस्तानच्या अनेक शहरांमध्ये वाजले सायरन.
कंदहारचा बदला पूर्ण! जैशचा दहशतवादी रौफ अझरचा खात्मा
कंदहारचा बदला पूर्ण! जैशचा दहशतवादी रौफ अझरचा खात्मा.
बॉम्बस्फोटांच्या मालिकांनी पाकिस्तान हादरलं! पाकच्या नौदल तळाजवळ बॉम्ब
बॉम्बस्फोटांच्या मालिकांनी पाकिस्तान हादरलं! पाकच्या नौदल तळाजवळ बॉम्ब.
ऑपरेशन सिंदूर अजून... मोदी सरकारचं मोठं वक्तव्य, आता पुढची पाऊलं काय?
ऑपरेशन सिंदूर अजून... मोदी सरकारचं मोठं वक्तव्य, आता पुढची पाऊलं काय?.