Sushant Singh Rajput : सुशांत सिंग राजपूत ड्रग्ज घ्यायचा, रिया चक्रवर्तीबाबत एनसीबीचा मोठा खुलासा
सुशांत मृत्यू प्रकरणात ड्रग अँगलची चौकशी करणाऱ्या एनसीबीने बुधवारी एनडीपीएस कोर्टात 287 पानांचे आरोपपत्र दाखल केले. यामध्ये रिया आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती यांच्या नावांसह एकूण 33 जणांना आरोपी करण्यात आले आहे.
मुंबई : सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरणी एनसीबीने मोठा खुलासा केला आहे. सुशांत ड्रग्ज (Drugs) घेत होता, अशी माहिती सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने एनसीबीकडे केला आहे. याबाबत एनसीबी (NCB)ने आरोपपत्रात खुलासा केला आहे. आरोपपत्रातील मुद्दा क्रमांक 304 मध्ये असे लिहिले आहे की, सुशांत सिंग राजपूतसाठी ड्रग डीलिंगमध्ये सामील असल्याचे रियाने कबूल केले आहे. आता एनडीपीएस कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आरोप सिद्ध झाल्यास रियाला 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागू शकतो. सुशांत सिंग राजपूत दिवसातून 4 वेळा ड्रग्ज घ्यायचा असे एनसीबीच्या आरोपपत्रातून समोर आले आहे. एनसीबीला रियाच्या व्हॉट्सअॅप चॅटवरून या गोष्टींची माहिती मिळाली, असे एनसीबीने म्हटले आहे.
पेडलरच्या सांगण्यावरून सुशांतने जॉइंट घेतला
आरोपपत्रानुसार, 2019 मध्ये ड्रग्ज विक्रेता सूर्यदीप मल्होत्रा याने सुशांतला पहिल्यांदा देसी जॉइंट (गांजा भरलेली सिगारेट) ऑफर केली. त्यानंतर सुशांतने देसी जॉइंट्स घ्यायला सुरुवात केली. पूर्वी तो इम्पोर्टेड क्वालिटीवाला गांजा घेत असे. आरोपपत्रात असेही म्हटले आहे की, मृत्यूच्या सुमारे 20 दिवस आधी सुशांतने शोविकला धूम्रपान सोडण्याबाबत सांगितले होते. सुशांत मृत्यू प्रकरणात ड्रग अँगलची चौकशी करणाऱ्या एनसीबीने बुधवारी एनडीपीएस कोर्टात 287 पानांचे आरोपपत्र दाखल केले. यामध्ये रिया आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती यांच्या नावांसह एकूण 33 जणांना आरोपी करण्यात आले आहे. एनसीबीने 6,272 पानांचे डिजिटल पुरावे, 2,226 पानांचे बँक दस्तऐवज आणि मोबाईल क्रमांकांची सीडीही न्यायालयात सादर केली आहे. पुरावा म्हणून 2,960 कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत.
49 पानांच्या अहवालात 32 वेळा रियाचे नाव
एनसीबीच्या 49 पानी अहवालात रियाच्या नावाचा 32 वेळा उल्लेख करण्यात आला आहे. पॉइंट क्रमांक 11 मध्ये लिहिलेय की, शोविक, सॅम्युअलच्या खुलाशानंतर दिपेश आणि रियाला 6, 7, 8 सप्टेंबर 2020 रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. ड्रग्ज प्रकरणात त्याचा सहभाग असल्याचे पुरावे मिळाले आहेत. या आधारे त्याला 8 सप्टेंबर 2020 रोजी अटक करण्यात आली. सध्या तो जामिनावर बाहेर आहे.
रियाचे घर ड्रग्जचा अड्डा होता
एनसीबीच्या आरोपपत्रानुसार, रियाने नोव्हेंबर 2019 च्या शेवटी सुशांतला तिच्या घरी बोलावले आणि पॅडलरकडून सुशांतसाठी ड्रग्स विकत घेतले. त्यानंतरही सुशांत अनेकदा रियाच्या घरी ड्रग्जसाठी यायचा. कधी शोविक तर कधी रिया त्यांना ड्रग्ज आणून देत असे. शोविक 2014 मध्ये धूम्रपान करत होता आणि 2016 मध्ये गांजा ओढू लागला. शौविक हा त्याचा मित्र सूर्यदीपकडून सुशांतसाठी ड्रग्ज आणायचा.
कधी-कधी फाइव्ह स्टार रिसॉर्टमध्ये गांजा पिण्यासाठी जायचा
नोव्हेंबर 2019 मध्ये, सुशांत मुंबईतील एका पंचतारांकित रिसॉर्टमध्ये (वॉटर स्टोन क्लब) काही दिवस राहिला. येथे वास्तव्यास असताना, सूर्यदीपने त्याच्यासाठी 50 ग्रॅम गांजा आणला होता आणि हा गांजा त्याचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा यांना दिला होता. त्याबदल्यात मिरांडाने त्याला 2500 रुपयेही दिले होते. यानंतर सूर्यदीपची सुशांतशी मैत्री झाली आणि दोघेही एकमेकांना अनेकदा भेटले. (NCBs big disclosure in the charge sheet regarding Rhea Chakraborty)