AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Umesh Kolhe Murder : अमरावतीतील उमेश कोल्हे हत्या प्रकरण, दोन आरोपींना 12 ऑगस्टपर्यंत एनआयए कोठडी

उमेश कोल्हे हत्याकांडमध्ये एनआयएने शुक्रवारी कोर्टामध्ये एक मोठा खुलासा केला आहे. या प्रकरणात अटक मौलवी मुशफीक अहमद आणि अरबाज यांनी उमेश कोल्हेची हत्या झाल्यानंतर जश्न साजरा केला होता आणि त्या अनुषंगाने एका डिनर पार्टीचे आयोजन केले होते.

Umesh Kolhe Murder : अमरावतीतील उमेश कोल्हे हत्या प्रकरण, दोन आरोपींना 12 ऑगस्टपर्यंत एनआयए कोठडी
उमेश कोल्हे
| Edited By: | Updated on: Aug 05, 2022 | 10:42 PM
Share

मुंबई : अमरावतीतील उमेश कोल्हे (Umesh Kolhe) हत्याकांड प्रकरणात एनआयएने बुधवारी आणखी दोन आरोपींना अटक (Arrest) केले. मुसफिक अहमद आणि अब्दुल अरबाज अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोघांना आज मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष एनआयए कोर्टासमोर हजर करण्यात आले. दोन्ही आरोपींना 12 ऑगस्टपर्यंत एनआयए कस्टडी (NIA Custody)मध्ये पाठविण्याचे आदेश कोर्टाने दिले आहे. या दोन्ही आरोपींवर कोल्हे हत्याकांडामध्ये सामील इतर आरोपींची मदत करणे आणि हत्येनंतर सेलिब्रेशन पार्टीचा आयोजन केल्याचा गंभीर आरोप एनआयएमार्फत कोर्टात करण्यात आला आहे. यापूर्वी सदर प्रकरणात एकूण 7 आरोपींना अटक करण्यात आली असून, आतापर्यंत एकूण 9 आरोपींना उमेश कोल्हे हत्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

आरोपींनी कोल्हेंच्या हत्येनंतर सेलिब्रेशन पार्टी केली होती

एनआयएने कोर्टाला दिलेल्या माहितीनुसार, उमेश कोल्हे हत्याकांडमध्ये एनआयएने शुक्रवारी कोर्टामध्ये एक मोठा खुलासा केला आहे. या प्रकरणात अटक मौलवी मुशफीक अहमद आणि अरबाज यांनी उमेश कोल्हेची हत्या झाल्यानंतर जश्न साजरा केला होता आणि त्या अनुषंगाने एका डिनर पार्टीचे आयोजन केले होते. मात्र ही पार्टी कुठे झाली त्यात कोण कोण सहभागी होतं याबाबत एनआयए आरोपींची चौकशी करायची आहे. यासाठी यासाठी आरोपींची रिमांड मागण्यात आली. चौकशीअंती सर्व बाबी उघड होतील. मुशफीक अहमद हा मौलवी आहे, तर अब्दुल अरबाज हा एका एनजीओमध्ये ॲम्बुलन्सचा ड्रायव्हर आहे. आज दोघांना एनआयए कोर्टात रिमांडसाठी हजर केले होते. यावेळी या दोन्ही आरोपींनी उमेश कोल्हे हत्याकांडाचा मास्टरमाइंड इरफान खान आणि इतर आरोपींना कोल्हेची हत्या झाल्यानंतर लपवण्यास मदत केली होती. (NIA remands two accused in Umesh Kolhe murder case in Amravati till August 12)

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.