7 वर्षांची असताना हरवली, तब्बल 9 वर्षांनी सापडली! मुंबईकर मुलीच्या भेटीची हृदयस्पर्शी कहाणी, सापडली कशी? गोष्ट इंटरेस्टिंग आहे

डीएन नगर पोलिसांनी नऊ वर्षांआधी हरवलेल्या सात वर्षांच्या चिमुरडीला पोलिसांनी अखेर शोधून काढलं.

7 वर्षांची असताना हरवली, तब्बल 9 वर्षांनी सापडली! मुंबईकर मुलीच्या भेटीची हृदयस्पर्शी कहाणी, सापडली कशी? गोष्ट इंटरेस्टिंग आहे
हरवलेल्या पुजाची हृदयस्पर्शी कहाणीImage Credit source: Hindustan times
Follow us
| Updated on: Aug 06, 2022 | 9:09 AM

मुंबई : सात वर्षांची चिमुकली हरवते. पुढचे काही वर्ष तिचा शोध सुरु राहतो. आई वडील आजोबा, भाऊ तिला शोधत राहतात. काही वर्ष तिचा शोध घेऊनही ती सापडत नाही. पोलिसातही (Mumbai Crime News) तक्रार दिली जाते. पण तरिही ती सापडत (DN Nagar Missing Girl) नाही. मधल्या काळात या मुलीच्या बाबांचाही मृत्यू होतो. आई शेंगदाणे विकून गुजराण करत असते. परिस्थिती हलाखाची! पोटची लेक गमावल्याचं दुःख आईच्या मनात सलत असतं. पण तब्बल नऊ वर्षांची मुलगी सापडते. अवघी सात वर्षांची असताना जी मुलगी हलवली, तिला नऊ वर्षांनी पाहिल्यानंतर आईदेखील (Missing Girl Mother) भारावून जाते. मुलीचं वाढलेलं वय, तिचं बदललेलं रुप, नऊ वर्ष सुरु असलेला तिचा शोध, सगळं एका क्षणात त्या आईच्या डोळ्यासमोरुन फ्लॅशबॅकसारखं जातं. ही काळजाला हात घालणारी घटना घडली आहे, मुंबईच्या अंधेरी परिसरामधली.

अंधेरी पश्चिमेच्या परिसरातून 2013 मध्ये सात वर्षांची मुलगी बेपत्ता झाली होती. या मुलीचा डीएन नगर पोलिसांकडून शोध घेतला जात होता. पण काही केल्या ही मुलगी शेवटपर्यंत आढळून आली नव्हती. अखेर या मुलीच्या कुटुंबीयांनी अपेक्षा सोडली होती. पण अखेर ही मुलगी सापडलीय. या मुलीच्या अपहरण प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटकही केलीय.

2013 ला पूजा हरवली

पूजा गौड असं हरवलेल्या मुलीचं नाव आहे. तिचं वय आता 16 वर्ष असून ती सात वर्षांची असताना हरवली होती. 22 जानेवारी 2013 रोजी ती हरवली असल्याची तक्रार डीएन नगर पोलीस स्थानकात देण्यात आली. ही 166 वी बेपत्ता मुलीची तक्रार डीएन नगर पोलीस स्थानकात देण्यात आलेली. मे 2015 पर्यंत बेपत्ता मुलीच्या तक्रारींमध्ये पूजा गौड ही एकमेव बेपत्ता मुलगी होती, जिचा ठावठिकाणा लागू शकला नव्हता. राजेंद्र भोसले हे तत्कालीन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक असताना यांनीही पूजाचा शोध घेण्यासाठी कसून तपास केला होता. पण निवृत्त होईपर्यंत त्यांना काही पूजाचा शोध लागू शकला नव्हता. पण निवृत्तीनंतरही राजेंद्र भोसले हे पूजाचा शोध घेत होते. टाईम्सशी बोलताना त्यांनी पूजाचा शोध घेण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल भाष्य केलंय. त्यांनी म्हटलंय, की…

हे सुद्धा वाचा

पूजाचा फोटो मी सोबत ठेवला होता. अजूनही मी जिथे जाईन तिथे पूजाची चौकशी करतो. अनोखळी लोकांकडे तिची विचारणा करायचो. तिचा फोटो दाखवयाचो. ड्युटीवर असताना तर संपूर्ण डीएन नगरचा परिसर पालथा घातला होता. त्यानंतरही वेगवेगळ्या ठिकाणी तिचा शोध घेण्यासाठी तपास केला होता. पण तब्बल नऊ वर्षांनी ती सापडल्यानंतर ही घटना किती हृदयस्पर्शी आहे, याची कल्पना फक्त मीच करू शकतो.

सगळ्या सापडल्या, पण पूजा नाही…

राजेंद्र भोसले हे सहाय्यक उपनिरीक्षक म्हणून डीएन नगरमध्ये कार्यरत होते. पालिकेच्या शाळेच्या आवारातून पूजाचं नऊ वर्षांपूर्वी अपहरण झालं होतं. याबाबतची तक्रार आल्यानंतर भोसले यांनी तपास सुरु केला होता. त्याच्याकडे असलेल्या बेपत्ता मुलींच्या तक्रारीपैकी सर्व मुलींचा शोध लागला होता. पण पूजाचा ठावठिकाणा शेवटपर्यंत लागू शकला नव्हता. पण राजेंद्र यांनी आशा सोडली नव्हती. पूजा अजूनही जिवंत असेल, असं त्यांनी वाटत होतं. त्यासाठी त्यांनी नेहमीच ते प्रार्थना करत असायचे. तिच्या शोधासाठी प्रयत्न करत राहायचे. निवृत्तीनंतर खेड-चिपळूणमध्ये असलेल्या भोसले यांनी याबाबत हरवलेल्या पूजाबाबत प्रतिक्रिया दिलीय. 2008 ते 2015 दरम्यान, 166 बेपत्ता मुलींची तक्रार समोर आली होती. त्यापैकी पूजाची तक्रार सोडली, तर सर्व मुलींना शोधण्यास भोसले यांना यश आलं होतं. त्यामुळेच निवृत्तीनंतरही त्यांनी पूजाचा शोध सुरुच ठेवला होता.

दुवा कबूल झाली

चार दिवसांपूर्वीच भोसले यांनी माहीम दर्ग्यात पूजा सापडावी, यासाठी देवाला प्रार्थना केली होती. तसंच पूजाच्या आईची भेट घेतली होती. त्यानंतर ते गावी खेडला निघून गेले होते. दरम्यान, डीएन नगर पोलिसांनी आपला तपास सुरुच ठेवला होता. स्थानिक खबऱ्यांच्या मदतीने पुजाबाबत काही माहिती पोलिसांनी मिळाली. पोलिसांनी जुहूच्या गजबजलेल्या चाळींमध्ये अखेर तपास केला आणि पुजाचा ठावठिकाणा शोधून काढला.

डीएन नगर पोलिसांची कामगिरी

डीएन नगर पोलिसांनी नऊ वर्षांआधी हरवलेल्या सात वर्षांच्या चिमुरडीला पोलिसांनी अखेर शोधून काढलं. तिचं अपहरण केल्याप्रकरणरी इलेक्ट्रीशियनचं काम करणाऱ्या हॅरी डिसोझा आणि त्याच्या बायकोला अटक केली. यानंतर पूजाला तिच्या आई आणि भावंडांच्या हवाले केलं. मूल होत नाही म्हणून हॅरी आणि त्याच्या पत्नीने सात वर्षांच्या पूजाचं अपहरण केलं होतं. पण नंतर अपत्य झाल्यानंतर हॅरी आणि त्याच्या बायकोनं पूजाला मोलकरणीसारखं राबवलं होतं. अखेर आता या दोघांच्याही मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. डीएन नगर पोलीस स्थानचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद कुर्डे यांनी याबाबतची माहिती दिलीय.

आईस्क्रीमचं आमीष

आईस्क्रीम देतो सांगून हॅरी डिसोझा आणि त्याच्या पत्नीनं पूजाचं अपहरण केलं होतं. पूजाचं अपहरण करुन त्यांनी तिचं नावंही बदललं होतं. पुजाचं नाव ऍनी करुन ठेवलं होतं. फक्त घरातच नव्हे तर इतरही ठिकाणी ऍनीला (पुजाला) मोलकरणीप्रमाणे राबवत होते. पुजाच्या अपहरणानंतर तीन वर्षांच्या डिसोझा दाम्पत्याला मूल झालं. त्यानंतर या दाम्पत्याने पुजाचा छळ करण्यास सुरुवात केली. याबाबतची टीप स्थानिक खबऱ्यांकडून मिळाल्यानंतर पोलिसांनी या दाम्पत्यावर संशय आला आणि त्यानंतर पोलिसांनी या संशयितांना ताब्यात घेऊन या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश केलाय.

Non Stop LIVE Update
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.